Bhagat Singh Koshiyari Resignation : राजे कडाडले! राज्यपालांच्या राजीनामा मंजुरीला उशीर

sambhaji raje udyanraje bhosale agressive
sambhaji raje udyanraje bhosale agressiveesakal
Updated on

नाशिक : राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्या राजीनामा मंजुरीला तसा उशीर झाला आहे, अशा शब्दांमध्ये खासदार उदयनराजे आणि संभाजीराजे छत्रपती रविवारी (ता. १२) कडाडले. राज्यपालांनी जबाबदारीने वक्तव्य करायला हवे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाला कुटुंब मानले. त्यांच्याविषयी एकेरी भाषेत उल्लेख करतात. तुमची लायकी काय आहे? अशा शब्दांत फटकारत उदयनराजे यांनी राजानाम्याला तसा उशीरच झाला, अशी खंत व्यक्त केली.

वेळेत निर्णय घेतल्यास बरंच काही सावरता येतं, असेही त्यांनी सांगितले. दुसरीकडे महाराष्ट्राला सुसंस्कृतपणाची ओळख आहे, असे सांगत संभाजीराजे छत्रपती यांनीही हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नाशिक दौऱ्यावर असलेले खासदार उदयनराजे आणि संभाजीराजे छत्रपती यांनी नाशिकमध्ये स्वतंत्ररीत्या पत्रकारांशी संवाद साधला. (sambhaji raje udyanraje bhosale agressive on Delay in approval of Governor bhagat singh koshyari resignation nashik political news)

वेळेत निर्णयाने सावरता येते : उदयनराजे

उदयनराजे म्हणाले, की राज्याच्या प्रमुख राज्यपालांनी जबाबदारीने वक्तव्य करायला हवे. कारण नसताना कुठलेही विधान करण्याने जनतेच्या भावना दुखावतात. जगात साम्राज्य वाढविण्यासाठी योद्ध्यांनी युद्ध केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी जनतेच्या कल्याणासाठी राज्य केले. पण ज्यांची उंची नाही, कधी ती उंची गाठू शकत नाही, असे लोक जेव्हा विधान करतात, तेव्ही ही विकृती आपल्याला पाहायला मिळते. कारण त्यांच्या विचारांची व्याप्ती ही संकुचित असते.

राज्यपाल पदावर राहताना तारतम्य बाळगले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे केलं तिथे आपण पोचू शकत नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज फक्त मते मिळविण्यासाठी आहेत काय? माझी विनंती आहे, की शिवाजी महाराज यांचा आदर करा.

त्यांचा अवमान खपवून घेणार नाही. राज्यपालांच्या वक्तव्यांविषयी राष्ट्रपती, पंतप्रधान यांना पत्रव्यवहार केला होता. राज्यपाल या पदावर अनुभव असलेले आणि वय अधिक नसलेल्या व्यक्तींबद्दल विचार करावा.

नवीन राज्यपालांचे आम्ही मनापासून स्वागत करतो. दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांचे स्वागत आहे. त्यांना तो अधिकार आहे, महत्त्वाकांक्षी असणे चुकीचे नाही. समाजाच्या हितासाठी सहकार्य आहे. ते परके नाहीत, असे उदयनराजे यांनी सांगितले.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

sambhaji raje udyanraje bhosale agressive
Political News : महाविकास आघाडीतील 22 आमदार आमच्या संपर्कात; शिंदे गटातील मंत्र्याचा मोठा गौप्यस्फोट

उशिरा सुचलेले शहाणपण : संभाजीराजे

राज्यपालांविषयीचा निर्णय खरेतर दोन महिन्यांपूर्वी घ्यायला हवा होता, असे सांगून संभाजीराजे म्हणाले, की नवीन राज्यपालांना आमच्या शुभेच्छा आहेत. महाराष्ट्राची एक ओळख आहे, त्यामुळे जुन्या झालेल्या चुका त्यांनी ध्यान्यात ठेवाव्यात, अशी आमची विनंती आहे.

महाराष्ट्रमधील सुसंस्कृतपणा बाहेर नेण्याची त्यांची जबाबदारी आहे. मात्र भगतसिंह कोश्‍यारी हे नेहमी वादग्रस्त वक्तव्य करायचे. त्यावरून गदारोळ झाला आहे. त्यांना कुणी पाठीशी घातले, हे सगळ्यांना माहिती आहे.

त्यांनी काय चूक केली, याचा अभ्यास नवीन राज्यपालांनी करावा. मुळातच, राज्यपाल हे कोणत्याही पक्षाचे नसतात. पी. सी. अलेक्झांडर हे सुसंस्कृत होते. त्याप्रमाणे काम व्हावे. घटनात्मक पद असल्याने काही मर्यादा असतात. मात्र जे चुकणार त्यांना ‘स्वराज्य’तर्फे ठोकले जाईल.

sambhaji raje udyanraje bhosale agressive
Political News : महाराष्ट्रात गुंडागर्दी, दादागिरी, दाऊद फाऊद..; जाता जाता काय बोलून गेले कोश्यारी?

संभाजीराजे म्हणाले...

- स्वराज्य संघटनेने राजकारणात यावे, ही महाराष्ट्रातील जनतेची अपेक्षा आहे

- सामान्य माणूस राजकारणात यायला हवा. सामान्य माणूस आमदार, खासदार व्हावा

- स्वराज्य संघटना राजकारणात निश्‍चित येईल. २०२४ मध्ये संघटनेतर्फे निवडणुका लढवल्या जातील

- स्वराज्य संघटनेसाठी राजकारणातील सर्व पर्याय खुले आहेत

- सामान्य जनतेच्या माझ्याकडून अपेक्षा आहेत. आम्हाला ‘स्पेस’ आहे की नाही, हे जनता ठरवेल

- किरीट सोमय्या यांच्याविषयी काय बोलणार, त्यांना विचारलं पाहिजे, की ‘सॅल्युट’चा खरा अर्थ काय?

sambhaji raje udyanraje bhosale agressive
Bhagat Singh koshyari: राजीनाम्यावर माविआकडून  काळे फुगे, अजित पवारांनी जोडले हात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.