Samruddhi Highway Accident Case: ’ टेम्पो ट्रॅव्हलरमध्येही जादा प्रवासी; 17 ची क्षमता असताना 35 प्रवासी

Samruddhi Highway Accident Case
Samruddhi Highway Accident Caseesakal
Updated on

Samruddhi Highway Accident Case : समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका या ना त्या कारणाने सुरूच आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूरनजीक असलेल्या जांबरगाव टोलनाक्याजवळ रविवारी (ता. १५) मध्यरात्री झालेल्या अपघातातील टेम्पो ट्रॅव्हलरची प्रवासी क्षमता १७ प्रवाशांची असताना, त्यात ३५ प्रवासी प्रवास करीत असल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे पुन्हा एकदा नाशिकमधील गेल्या वर्षीच्या पहाटेच्या सुमारास खासगी ट्रॅव्हल्सच्या अपघाताच्या आठवणीला उजाळा मिळाला. खासगी प्रवासी वाहनांमधून क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहतूक केल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

समृद्धी महामार्गावर चेक पॉइंट असतानाही प्रवासी वाहनांतील प्रवाशांची क्षमता तपासली जात नसेल तर प्रादेशिक परिवहन विभाग, राज्य महामार्ग सुरक्षा विभागाच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होते. मात्र, नेहमी दुर्घटनेनंतरच याविषयी चर्चा होते, हे दुर्दैव. (Samruddhi Highway Accident Case Excess passengers in Tempo Traveler too 17 with capacity of 35 passengers nashik)

नाशिक येथून भाविक प्रवाशांना घेऊन टेम्पो ट्रॅव्हलर (एमएच २० जीपी २२१२) बुलढाण्यातील दर्ग्याचे दर्शन करून समृद्धी महामार्गाने परतीच्या प्रवासाला निघाला होता.

रविवारी मध्यरात्री दीड-दोनच्या सुमारास वैजापूर येथील जांबरगाव टोलनाक्यानजीक उभ्या असलेल्या ट्रकला टेम्पो ट्रॅव्हलर मागून जाऊन धडकला.

या भीषण अपघातात ट्रॅव्हलरमधील १२ प्रवासी ठार, तर २३ जखमी आहेत. या ट्रॅव्हलरमध्ये चालकासह ३५ प्रवासी प्रवास करीत होते. हे प्रमाण क्षमतेच्या दुप्पट असल्याचे दिसून येत आहे. यात लहान मुलांसह महिलांचाही समावेश होता.

गेल्या वर्षी (८ ऑक्टोबर) नाशिकमध्ये मिरची हॉटेल चौफुलीवर भरधाव खासगी ट्रॅव्हल्सच्या बसने चौफुलीवर आडव्या गेलेल्या ट्रकला धडक दिली. या भीषण अपघातात बसने पेट घेतला आणि पाहता-पाहता ती आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती.

यात १२ प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेतही ट्रॅव्हल्समध्ये क्षमतेपेक्षा जादा प्रवासी प्रवास करीत होते, हे तपासातून निष्पन्न झाले होते.

Samruddhi Highway Accident Case
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावरील 12 जणांच्या मृत्यूला RTO जबाबदार; RTOने ट्रकला महामार्गावर थांबवल्याचा Video आला समोर

तत्कालीन पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी नाशिक हद्दीतून जाणाऱ्या महामार्गांवरील खासगी वाहनांतील प्रवासी क्षमता तपासणी सुरू केली होती.

जादा प्रवासी असलेल्या खासगी ट्रॅव्हल्सविरोधात दंडात्मक कारवाईसह जप्तीचीही कारवाई केली होती. परंतु, काही महिन्यांतच ही तपासणी बंद झाली आणि पुन्हा ‘जैसे थे’ झाले.

संबंधित विभागाची अकार्यक्षमता

समृद्धी महामार्गावर ठराविक अंतरावर चेक पॉइंट आहेत. या ठिकाणी प्रादेशिक परिवहन विभागासह राज्य महामार्ग सुरक्षा विभागाचे पोलिस अधिकारी-कर्मचारी असतात. या विभागांना खासगी प्रवासी वाहनांतील प्रवाशांची क्षमता, वाहनांची तांत्रिक माहिती तपासण्याचा अधिकार आहे.

असे असतानाही या विभागाकडून सक्षमतेने आपली जबाबदारी पार पाडली जात नाही. परिणामी, खासगी प्रवासी ट्रॅव्हल्स, टेम्पो ट्रॅव्हल्समधून बिनधास्तपणे जादा प्रवासी वाहतूक केली जाते. परंतु, दुर्दैवी घटना घडल्यावरच या विषयाची चर्चा होते. प्रत्यक्षात त्यावर अंमलबजावणी होत नाही.

Samruddhi Highway Accident Case
Samruddhi Highway Accident Case: राजीवनगरवर शोककळा, चौघांच्या मृत्यूने हळहळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.