सातपूर (जि. नाशिक) : नाशिकच्या उद्योग जगतासाठी आनंदाची बातमी असून, एबीबी या बहुराष्ट्रीय कंपनीने नाशिकमध्ये विस्तार केल्यानंतर आता गोंदे येथील लाइफस्टाइल बॅग आणि ट्रॅव्हल लगेज उत्पादक सॅमसोनाइट साऊथ एशिया या कंपनीने नाशिकमध्ये प्रकल्प विस्ताराची घोषणा केली आहे.
कंपनी दुसऱ्या टप्प्यासाठी तब्बल दोनशे कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक करत हा विस्तार करणार आहे. कंपनीचे उपाध्यक्ष व नाशिक प्रकल्पाचे प्रमुख यशवंत सिंग यांनी ‘सकाळ’शी बोलताना ही माहिती दिली. (Samsonite Project Expansion in Nashik Will invest 200 crore Nashik News)
मुंबई-आग्रा महामार्गावर गोंदे येथे सॅमसोनाइट कंपनीचा प्रकल्प आहे. कंपनीला भारतासह दक्षिण आशियात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे कंपनीने येथील प्रकल्पात विस्ताराची योजना आखली आहे. याबाबत कामगार युनियनबरोबर नुकताच करार झाला. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यापूर्वीच कामगारांना तशी कल्पना दिली होती. मात्र अधिकृत घोषणा बाकी होती.
सद्यःस्थितीत कंपनीच्या प्रकल्पातून वर्षाकाठी पाच लाख बॅगा तयार होतात. विस्तारानंतर पुढील वर्षाच्या अखेरीस ही क्षमता ७.५ लाख होईल. त्यापुढील वर्षाच्या अखेरीस हीच क्षमता थेट दहा लाख एवढी होणार आहे. यासाठी नवीन कारखान्यांसाठी इतर राज्यांच्या व्यवहार्यतेचा शोध घेतला जाईल.
सॅमसोनाइट कंपनीने अलीकडेच बिहारमधील दरभंगा येथे एक किरकोळ आउटलेट उघडले आहे तसेच बिहारमध्ये कटिहार आणि मुझफ्फरपूर येथेही स्टोअर लॉन्च करण्याची योजना आहे. याद्वारे कंपनीच्या मालकीच्या स्टोअरची संख्या ६५ पर्यंत जाईल.
विस्ताराचा भाग म्हणून एक लाख ८० हजार चौरसफूट एवढे बांधकाम करण्याचे कंपनीने निश्चित केले आहे. हे बांधकाम या वर्षाच्या अखेरीस सुरू होण्याची अपेक्षा आहे. हार्ड लगेज उत्पादन क्षमतेसाठी १२५ ते १५० कोटींची गुंतवणूक केली जाईल.
हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
स्वयंचलित गुदामांसाठी ५० कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याचे नियोजन आहे. रिटेल स्टोअर्सचे लक्ष्य कंपनीने ठेवले आहे. ट्रॅव्हल लगेज उद्योग पुढील दहा वर्षांत एक लाख कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे, त्यादृष्टीने कंपनी नियोजन करीत आहे.
"कंपनीने यापूर्वी नाशिक प्रकल्पात वेळोवेळी गुंतवणूक करत आपली उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. या वेळी कंपनीने मोठ्या गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवले आहे. त्यामुळे दीर्घकाळ सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल."
- यशवंत सिंग, उपाध्यक्ष, सॅमसोनाइट
"‘सॅमसोनाइट’चे नाशिककरांशी वेगळे नाते आहे. नव्याने गुंतवणूक करण्याची घोषणा केल्याने ते अधिक वृद्धिंगत होणार आहे. यामुळे रोजगार निर्मितीबरोबरच औद्योगिक क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण होणार आहे. या कंपनीबरोबर ‘सीटू’ने नेहमीच सहकार्य केले आहे, यापुढेही करेल." - डॉ. डी. एल. कराड, कामगार नेते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.