Sakal Special : संदर्भ सेवा रुग्णालयाकडे 2 कोटीची थकबाकी!
जुने नाशिक (जि. नाशिक) : संदर्भ रुग्णालयाकडे महापालिकेची १४ वर्षांची सुमारे १ कोटी ९३ लाख १८ हजार १६८ रुपयांची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे. इतकेच नाही तर रुग्णालयाची इमारतीस बांधकाम पूर्णत्वाचा दाखला नसल्याचेही उघड झाले आहे.
अनुदानाअभावी थकबाकी रखडल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. सरकारला पत्रव्यवहार करून अनुदानाची मागणी केल्याचेही सांगण्यात आले. (sandarbh hospital have 14 years Municipal Corporation dues of Rs 2 crores nashik news)
२००८ पासून रुग्णालय प्रशासनाकडून महापालिकेचे पाणीपट्टी भरलेली नाही. गेल्या १४ वर्षात त्यांच्याकडे १ कोटी ९३ लाख १८ हजार १६८ रुपयांची थकबाकी आहे. मार्च अखेर महापालिका पूर्व विभागीय कार्यालयातर्फे दरवेळेस रुग्णालय प्रशासनास थकबाकी भरण्यासाठी नोटीस दिली जाते.
प्रशासनाकडून मात्र थकबाकी अद्याप भरण्यात आलेली नाही. रुग्णालय प्रशासनाकडे थकबाकी भरण्यासाठी आवश्यक असलेले अनुदान नाही. त्यात थकबाकीची रक्कम मोठी असल्याने त्यांना भरणे शक्य नाही. त्यांच्यातर्फे सरकारला पत्रव्यवहार करून अनुदानाची मागणी केली आहे. त्यांनादेखील दप्तर दिरंगाईचा अनुभव येत आहे.
तर, दुसरीकडे रुग्णालयास अद्याप घरपट्टी आकारली नसल्याचेही समोर आले आहे. २००८ पासून रुग्णालय सुरू आहे. तेव्हापासून आजपर्यंत रुग्णालयाकडून घरपट्टी आकारली नाही. याबाबत रुग्णालय प्रशासनाकडून माहिती घेतली असता, यापूर्वी थोड्याफार प्रमाणात पाणीपट्टी भरली आहे. सध्याच्या थकबाकीची रक्कम अधिक असल्याने अनुदानासाठी सरकारकडे पत्रव्यवहार केला आहे, तर घरपट्टी आकारणी संदर्भात तांत्रिक अडचणी असल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस
कारवाईकडे लक्ष
संदर्भ सेवा रुग्णालय निर्माण होऊन १४ वर्षे उलटली आहे. अद्याप शासकीय बांधकाम विभागाकडून पूर्णत्वाचा दाखला दिलेला नाही. त्यामुळे महापालिकेस अधिकृतरीत्या घरपट्टी आकारणीस अडचण येत आहे.
घरपट्टी आकारणी झाली नसल्याने आतापर्यंत महापालिकेचे कोटींचे नुकसान झाले आहे. महापालिका आयुक्तांकडून अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यास सुरवात केली आहे. यामुळे सर्वांचे कारवाईकडे लक्ष लागून आहे.
"मध्यंतरी थोड्या फार प्रमाणात पाणीपट्टी भरण्यात आली आहे. उर्वरित थकबाकी भरण्यासाठी अनुदान नसल्याने अनुदानासाठी सरकारला पत्र देण्यात आले आहे. अनुदान प्राप्त होताच थकबाकी भरण्यात येणार आहे. तर घरपट्टी आकारणी संदर्भात तांत्रिक अडचण आहे."
- विलास पाटील, वैद्यकीय अधीक्षक, संदर्भ सेवा रुग्णालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.