Sanjay Raut : सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षाबाबत दिलेल्या निर्णयाचे चुकीच्या पद्धतीने शिंदे व फडणवीस गटाकडून विश्लेषण केले जात आहे. सर्वसामान्यांनाही कायदा कळतो, तेथे चुकीच्या पद्धतीने सत्तेत आलेले हे उसने अवसान आणून ढोलताशांच्या गजरात नाचत आहेत.
परंतु एक मात्र निश्चित, सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेली लक्ष्मणरेषा विधानसभा अध्यक्षांनादेखील ओलांडता येणार नाही. नव्वद दिवसांत राज्य सरकार पडेल, असा दावा शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केला. (Sanjay Raut claim statetment over disqualification of MLA court announcement nashik political news)
नाशिकमध्ये खासदार राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल सर्वसामान्यांना स्पष्ट शब्दांत कळणारा आहे. परंतु राज्यात सत्तेत असलेले लोक आमच्याच बाजूने निकाल लागला, असं खोटं अवसान आणून चुकीच्या पद्धतीने निकालाचे विश्लेषण करत आहेत.
कोर्टाने अशा पद्धतीने निकाल दिला आहे, की शिंदे व फडणवीस गटाला नागडं करून विधानसभा अध्यक्षांकडे पाठविले आहे. न्यायालयाच्या निकालामुळे राज्यातील सरकार बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले.
शिंदे गटाने नियुक्त केलेला प्रतोद व त्याने बजावलेला व्हीप चुकीचा असल्याचे स्पष्ट केले आहे. सरकारची प्रत्येक कृती बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाचे निकालातून स्पष्ट होते. गटनेतेपदी शिंदे यांची केलेली निवड देखील बेकायदेशीर ठरविली आहे.
एवढे नागडे करूनही नाचणं म्हणजे बेशरमपणाचे आहे. देवेंद्र फडणवीस वकील असल्याचे एकले आहे. सर्वसामान्यांना जेथे कायदे कळतो, तेथे त्यांना कळू नये, हे लाजिरवाणे आहे. मूळ पक्षातून फुटलेले लोक पक्षावर दावा करू शकतं नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
शिवसेनेच्या वतीने सोळा आमदारांना अपात्र करावे, अशी याचिका दाखल केली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण सरकारच बेकायदेशीर ठरविले. त्यामुळे उसनं अवसान आणून जे नाचतात ते सर्वोच्च न्यायालयाचा देखील अपमान करत आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला नसता तर परिस्थिती वेगळी असती. यावर बोलताना ज्यांनी पाठीत खंजीर खुपसला त्यांच्या पाठिंब्यावर मला सत्तेत राहायचे नाही, ही नैतिकता उद्धव ठाकरे यांनी दाखविली. त्यातून राजीनामा दिल्याचे राऊत यांनी स्पष्टीकरण दिले.
विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांकडून दबाव
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर परदेशातून न्यायालयाच्या निकालावर मुलाखती देताय. त्यांच्या मुलाखतीतून प्रकरण माझ्याकडेच येणार, मीच निर्णय घेणार, असे सांगितले जात आहे. याचाच अर्थ अध्यक्ष नार्वेकर हे दबाव आणत आहेत.
अनेक पक्ष बदललेल्या नार्वेकरांना स्थैर्य व विचार नाही. अशा व्यक्तीच्या हाती निकालाची सूत्रे देण्यात आली आहे. परंतु आता ते विधानसभेचे अध्यक्ष असल्याने त्यांच्याकडे अधिकार आहे. परंतु कायद्याच्या चौकटीत राहूनचं त्यांना निकाल द्यावा लागेल.
अध्यक्ष नार्वेकरांना निकाल देताना न्यायालयाने लक्ष्मणरेषा आखून दिली आहे. तेव्हाच्या परिस्थितीला अनुसरूनच निकाल द्यावा लागेल. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार परिस्थिती बघता तीन महिन्यांत सरकार कोसळेल, हे नक्की असल्याचे राऊत म्हणाले.
सरकार बेकायदा, आदेश पाळू नका
पोलिस, तसेच शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या बेकायदा सरकारचे कुठलेही आदेश पाळू नये. जे आदेश पाळतील ते अडचणीत येतील. कारण हे सरकार न्यायालयाने बेकायदेशीर ठरविले आहे.
सरकारने घेतलेले सर्व निर्णय चुकीचे व अपात्र ठरतील. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह सर्व आमदार व मंत्री चुकीच्या निर्णयामुळे अडचणीत येणार असल्याचा दावा खासदार राऊत यांनी केला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
निर्लज्ज, बेशरमपणाचा कळस
शिंदे गट व भाजपच्या पोपटांकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालासंदर्भात संभ्रम व गोंधळ निर्माण केला जात आहे.
भाजपचा आयटी सेल त्यात आघाडीवर आहे. शिंदे-फडणवीस पत्रकार परिषदा घेऊन निर्लज्जपणा व बेशरमपणा सिद्ध करीत आहेत. निकालाचे विश्लेषण चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर मांडत आहेत, असा आरोप राऊत यांनी केला.
...तर महाराष्ट्र समजेल
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार नव्वद दिवसांत निर्णय घ्यावाच लागेल. प्रकरणाची दाबादाबी चालणार नाही. निर्णय घेतल्यास त्यांना महाराष्ट्र काय आहे हे समजेल, असा इशारा देताना राऊत यांनी चुकीचा निर्णय घेतल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील सत्तेतून जावे लागेल. जगभर लोकशाहीचा डंका पिटणाऱ्या पंतप्रधान मोदी हे महाराष्ट्रातल्या निकालावर डोळे लावून बसले का? असा सवाल त्यांनी केला.
अंतर्वस्त्रे काढली तरी नाच
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बारकाईने वाचला, तर शिंदे व फडणवीस सरकारला उघडे-नागडे केले आहे. तरीही निर्लज्जपणाने, उसने अवसान आणून नाच-गाणे केले जात असल्याचा टोला राऊत यांनी लगावला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.