Sanjay Raut : 'शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही, 16 आमदार अपात्र ठरतील'

शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही असं मी बोललो होतो. यावरती मी अजूनही ठाम आहे.
Sanjay Raut Eknath Shinde Devendra Fadnavis
Sanjay Raut Eknath Shinde Devendra FadnavisSakal
Updated on
Summary

मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप आहेत. या अधिवेशनात सरकारचा गोंधळ पाहायला मिळाला.

नाशिक : मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप आहेत. या अधिवेशनात सरकारचा गोंधळ पाहायला मिळाला. सरकारमध्ये आता दोन गट पडले असून हळूहळू चित्र बदलतंय, असं खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्पष्ट केलं. ते नाशिक दौऱ्यावर आले आहेत.

माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले, 'शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही असं मी बोललो होतो. यावरती अजूनही मी ठाम आहे. कायद्यानुसार, 16 आमदार अपात्र ठरणार आहेत. त्यामुळं हे सरकार सध्या व्हेंटिलेटवर आहे. हे सरकार कधी उलथवायचं हे जनतेला चांगलं ठाऊक आहे.'

Sanjay Raut Eknath Shinde Devendra Fadnavis
Jayant Patil : शरद पवार आमच्या पाठीशी, थोडा धीर धरा.. मविआ पुन्हा सत्तेत येईल; NCP प्रदेशाध्यक्षांचा दावा

शिवसेना एकच आहे आणि कायम एकच राहील. उध्दव ठाकरेंसोबत अख्या महाराष्ट्र उभा आहे. त्यामुळं नाशिकचे शिवसैनिक जागेवरच आहेत, ते कुठंही जाणार नाहीत. सध्या राज्यातलं वातावरण परिवर्तनाच्या दिशेनं सुरु आहे, त्यामुळं हे सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही, असा पुनरुच्चार राऊतांनी केला.

Sanjay Raut Eknath Shinde Devendra Fadnavis
Hindu Girls : हिंदू मुलीसोबत बोलणंच काय, फिरणंही बनलं कठीण; तरुणीसोबत मंदिरात आलेल्या मुस्लिमाला बेदम मारहाण

अधिवेशनात मुख्यमंत्र्यांसह सहा मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं आली तरी सरकार ठोंब्याप्रमाणं बसून होतं. सरकारमध्ये दोन गट आहेत. तुमचं तुम्ही बघा, आमचं आम्ही बघा सुरू आहे. तुमचं तुम्ही बघावाल्यांचं सरकार 40 आमदारांच्या पलिकडं नाही. 40 आमदारांची ख्याली खुशाली पाहण्यासाठी सुरू आहे. राज्यात 2024 ची तयारी सुरू आहे. त्याआधीच परिवर्तन होईल. हे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही. माझं मत पक्कं आहे, असंही राऊत म्हणाले.

Sanjay Raut Eknath Shinde Devendra Fadnavis
Air India Case : विमानात महिलेच्या अंगावर लघवी करणाऱ्या मुंबईच्या मिश्राला कर्नाटकात अटक

शिवसेनेच्या 16 आमदारांविरोधात अपात्रतेचा खटला कोर्टात सुरु आहे. न्यायव्यवस्थेवर कोणताही दबाव आला नाही तर निकाल आमच्या बाजूनं लागणार आणि न्यायालयात आम्हाला न्याय मिळणार, हे निश्चित आहे. त्यामुळंच हे सरकार फार काळ टिकाणार नाही, हे मी ठामपणे सांगू शकतो, असा दावाही राऊतांनी केलाय. यावेळी त्यांनी राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.