Nashik Bank Fraud: पालकमंत्र्यांकडून हिरेंविरोधात कटकारस्थान : संजय राऊत

Nashik Bank Fraud: पालकमंत्र्यांकडून हिरेंविरोधात कटकारस्थान : संजय राऊत
Updated on

Nashik Bank Fraud: मालेगावचे मंत्री हिरे कुटुंबीयांना घाबरले आहेत, त्यामुळे त्यांच्याविरोधात मंत्र्याने कटकारस्थान करून हिरेंना तुरुंगात टाकले. अशा कारवाईंना आम्ही घाबरत नाही. परंतु, याचे उत्तर मिळणार, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी पालकमंत्री दादा भुसे यांना बुधवारी (ता. २२) येथे दिला.

मी हिरे कुटुंबीयांची भेट घ्यायला नाशिकमध्ये आलो आहे, असे समर्थनही त्यांनी केले. मालेगावमध्ये हिरेंचे आव्हान निर्माण झाल्याने पालकमंत्र्यांकडून कटकारस्थान रचल्याचा आरोप त्यांनी केला. (sanjay raut statement about dada bhuse advay hiray bank fraud nashik news)

राज्यातील सत्तासंघर्षाचा एक पट मालेगावमध्ये दिसून येत आहे. शिवसेनेत फुटीनंतर मालेगाव बाह्यचे आमदार दादा भुसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्याने शिवसेनेला आव्हान दिले. अद्वय हिरे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यावर त्यांना उपनेतेपद मिळाले. उद्धव ठाकरे यांची हिरेंच्या समर्थनार्थ मालेगावी जंगी सभा झाली. मालेगाव बाह्य मतदारसंघात हिरे यांच्याकडून पालकमंत्री भुसे यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण केले.

त्याची परिणती मालेगाव बाजार समितीच्या निवडणुकीत हिर यांनी भुसे यांचा दणदणीत पराभव केला. भविष्यात मालेगाव बाह्य मतदारसंघाची राजकीय परिस्थिती बदलण्याचे संकेत बाजार समितीच्या निवडणुकीतून दिसून आल्याने पालकमंत्री भुसे यांनी हिरे यांच्याविरोधात दंड थोपटले. त्या पार्श्वभूमीवर खासदार राऊत यांनी हिरे कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी पालकमंत्री भुसे यांच्यावर टीका केली.

Nashik Bank Fraud: पालकमंत्र्यांकडून हिरेंविरोधात कटकारस्थान : संजय राऊत
Advay Hire Arrest Case: अद्वय हिरेंच्या अटकेमध्ये दादा भुसेंचा सहभाग नाही; शिवसेनेतर्फे माहिती

ते म्हणाले, की पालकमंत्री भुसे राजकीय सुडापोटी हिरेंवर कारवाई करीत आहेत. अद्वय हिरे तुरुंगातून बाहेर आल्यावर मी मालेगावलाही जाणार आहे. मनोज जरांगे-पाटील आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्यात सुरू असलेल्या वादावर मात्र त्यांनी भाष्य करण्याचे टाळले. भुजबळ आणि जरांगे-पाटील एकमेकांना प्रत्युत्तर देण्यासाठी समर्थ असल्याचे ते म्हणाले.

शिवसेनेचे नाशिकमधून रणशिंग

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून रणशिंग फुंकले जाणार आहे. त्यासाठी नाशिकमध्ये डिसेंबर किंवा जानेवारीत राज्यव्यापी कार्यक्रम घेतला जाईल. त्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित राहतील. त्याचवेळी हिरे कुटुंबीयांची ते भेट घेणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.

Nashik Bank Fraud: पालकमंत्र्यांकडून हिरेंविरोधात कटकारस्थान : संजय राऊत
Nashik Bank Fraud: अद्वय हिरे यांच्या पोलिस कोठडीत वाढ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.