Sanjay Raut News : विधानसभा अध्यक्षांना ‘आयसीयू’मध्ये टाकण्याची वेळ; खासदार राऊत यांचा शाब्दिक हल्लाबोल

Sanjay Raut and Rahul Narvekar
Sanjay Raut and Rahul Narvekar
Updated on

Sanjay Raut News : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे पदाला न्याय देत नाहीत, हे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांच्या टाळक्यात हातोडा मारल्याने त्यांनाच ‘आयसीयू’मध्ये टाकण्याची वेळ आली.

मृत्यूशय्येवर असलेल्या सरकारला विधानसभेच्या अध्यक्षांनी ‘आयसीयू’मध्ये ठेवून जितके वाचवायचे तितके वाचविले, आता ७२ तासांत हे सरकार कोसळेल, असा दावा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी (ता. १३) येथे केला.

नाशिक दौऱ्यावर आलेल्या खासदार राऊत यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, की सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना मोठी चपराक दिली. (sanjay raut statement about rahul narvekar nashik news)

नार्वेकर हे त्याच योग्यतेचे आहेत. आमदार अपात्रता प्रकरणाला संविधानिक पद्धतीने हाताळणे आवश्यक होते. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही.

न्यायालयाने ‘सौ सोनार की और एक लोहार की’ ही म्हण खरी करून दाखविली. आता तरी त्यांनी शहाणपणाने वागावे, अन्यथा न्यायव्यवस्था कशी पायदळी तुडवितात, हे उघड होईल. विधानसभा अध्यक्षांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान हलक्यात घेऊ नये. आता सरकार जाण्याची वेळ आली असून, ७२ तासांत सरकार कोसळेल, असा दावा खासदार राऊत यांनी केला.

दिल्लीत जाऊन आदेश आणलेल्या नार्वेकर यांनी सरकार जितके वेळ ‘आयसीयू’त ठेवून वाचविता येईल, तितके वाचविले. आता अध्यक्षांनाच ‘आयसीयू’मध्ये जाण्याची वेळ आल्याची टीका त्यांनी केली. दहा पक्ष फिरून १२ गावांचे पाणी प्यालेल्या लोकांना राज्यघटनेशी काहीही देणे-घेणे नाही. दिल्लीच्या आदेशाने सरकार वाचवायचे, एवढेच त्यांना माहीत असल्याची टीका राऊत यांनी केली.

Sanjay Raut and Rahul Narvekar
Sanjay Raut News : ड्रग्जप्रकरणी मंत्री भुसे, फडणवीसांचा राजीनामा घ्या : संजय राऊत

योग्य वेळी योग्य निर्णय

सरकार वाचविण्यासाठी कायद्याची मोडतोड करून सरकार वाचविणाऱ्यांना न्यायालयाने जोरदार चपराक दिली आहे. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर हे दिल्लीत जाऊन आदेश घेतात. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, असे ते म्हणतात. त्यांनी आम्हाला सांगू नये. आता तुमचा निर्णय आम्हीच घेऊ. त्यासाठी २०२४ पर्यंत थांबण्याचीही आवश्यकता नाही, असा इशारा राऊत यांनी दिला.

नाशिक ड्रगमाफिया व गुन्हेगारांचा अड्डा

धार्मिक शहर म्हणून ओळख असलेल्या नाशिकसाठी ड्रगमाफिया व गुन्हेगारांचा अड्डा ही ओळख अशोभनीय आहे. गुजरातमधून व्हाया सुरत नाशिकमध्ये एमडी ड्रग येते. नाशिकचे आजी-माजी पालकमंत्री व पोलिसही या ड्रग्ज माफियांच्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा आरोप खासदार राऊत यांनी केला.

Sanjay Raut and Rahul Narvekar
Sanjay Raut: नाशिक उडता पंजाब होतंय! शाळेतील मुलांच्या बॅगमधून ड्रग...; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.