Sanjay Raut News : ड्रग्जप्रकरणी मंत्री भुसे, फडणवीसांचा राजीनामा घ्या : संजय राऊत

Sanjay Raut
Sanjay Raut esakal
Updated on

Sanjay Raut News : नाशिकमधील ड्रग्ज प्रकरणात पालकमंत्री दादा भुसे पुरावे नष्ट करत असून, सर्वप्रथम त्यांचा व त्यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी (ता. १२) येथे पत्रकार परिषदेत केली.

ड्रग्ज प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. ‘ललीत पानपाटील ससून रुग्णालयात भरती कसा झाला, ससूनच्या डीनला भाजपचा मंत्री व आमदार मार्गदर्शन करत होता, हे सगळे रेकॉर्डवर असून, ललीत पाटील याच्याकडून शिंदे सेनेच्या एका मंत्र्यासह आमदारांनीही खोके घेतले असल्याचा आरोपही त्यांनी केला. (Sanjay Raut statement about Resignation of ministers Bhuse Fadnavis in drug case nashik news)

श्री. राऊत गुरुवारी नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, की ललित पाटील पुण्याच्या येरवडा तुरुंगात असताना ससून रुग्णालयात त्याला कोणी भरती केले? येरवड्यातून बाहेर कोणी काढला व ससूनमध्ये भाजपचा कोणता मंत्री व आमदार त्याला मार्गदर्शन करत होता.? त्यानंतर ललित पाटील पळून कसा गेला व त्याचे नाशिक भाजपशी कनेक्शन काय आहे, ते रेकॉर्डवर आहे. यात भाजपचे प्रमुख नेते व शिवसेनेतून शिंदेचे गटात गेलेले काही मंत्री आहेत. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे, ती सरकारला खरंच करायची असेल, तर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांचा प्रथम राजीनामा घेतला पाहिजे.

भुसे यांनी शेतकऱ्यांच्या पैशातून १७८ कोटींचा भ्रष्टाचार केला आहे. मी आरोप केल्यावर त्यांनी मला नोटीस पाठविली. भुसे यांनी कितीही खटले दाखल केले, तरी हे लपून राहणार नाही. यासंदर्भात ‘ईडी’कडेही तक्रार केली आहे. सध्या त्यांच्यावर कारवाई होणार नसली तरी २०२४ मध्ये त्यांच्यावर नक्की कारवाई होईल, असा दावा राऊत यांनी केला.

Sanjay Raut
Nashik Drug Case : ड्रग्ज प्रकरणात एकमेकांवर चिखलफेक, मूळ विषय बाजूला : पालकमंत्री भुसे

गुन्हेगारांना तुरुंगातून बाहेर काढून त्यांचा वापर राजकारणासाठी केला जात असल्याची नवीन ‘मोडस ऑपरेंडी’ सध्या वापरली जात आहे. निवडणुका येतील, त्याप्रमाणे गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगारांना बाहेर काढून त्यांना निवडणुकीत उतरवले जाईल, असा आरोप राऊत यांनी केला.

नार्वेकरांकडून फार अपेक्षा नाहीत

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून आमदार अपात्रतेबाबत फारशी अपेक्षा नाही. ते फक्त वेळकाढूपणा करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही निर्णय झालेला नाही. विधानसभा अध्यक्ष संविधान व कायद्याचा मुडदा पाडत आहेत.

भारत विरुद्ध गुजरात असा वाद निर्माण झाला आहे. देशात उद्योगांवर गुजराती व्यापारी कब्जा करत असल्याचा आरोप त्यांनी केला. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी संरक्षणासाठी भाजपसोबत जाऊन मंत्रिपद घेतल्याचा आरोपही राऊत यांनी केला.

Sanjay Raut
Nashik Drug Case : पुणे पोलिसांनी केली ‘भूषण’सह स्पॉटव्हिजीट; पुणे, मुंबई पोलिस नाशिकमध्ये तळ ठोकून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.