Sanjay Raut News : विरोधकांना नामोहरम करायचे हे भारतीय जनता पक्षाची रणनीती आहे. त्या रणनीतीला आम्ही बळी पडणार नाही. शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या बाबतीत जे काही घडले ते चुकीचे आहे.
संपूर्ण शिवसेना ही बडगुजर यांच्या पाठीशी असल्याचे समर्थन शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी शनिवारी (ता. २३) येथे केले. (Sanjay Raut statement about Shiv Sena with Badgujar nashik news)
पुढील महिन्यात शिवसेनेचे महाशिबिर नाशिकमध्ये होत आहे. शिबिराच्या तयारीसाठी खासदार राऊत शनिवारी (ता. २३) नाशिकमध्ये आले होते. या वेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, भारतीय जनता पक्षाने ठरवलेलं आहे, ‘स्वतःचं ठेवायचं झाकून अन् दुसऱ्याचे बघायचे वाकून’. सुधाकर बडगुजर हे अनेक वर्षांपासून नाशिकच्या राजकारणात कार्यरत आहेत.
बडगुजर यांचे नाव ज्यांच्या बरोबर जोडले गेले आहे, तो एक अपघात आहे. असंच असेल तर देशातला अख्खा भारतीय जनता पक्ष रिकामा करावा लागेल. बडगुजर यांची चौकशी करताय... करा, हरकत नाही; परंतु आम्ही तुम्हाला काही नावे देऊ त्यांचीही चौकशी करा. ललित पाटीलकडून मालेगाव येथून घराघरांत कसे हप्ते पोहोचत होते, त्या व्यवहारात तुमचे मूलबाळं कशी सहभागी होती, याची माहिती आम्ही आता पोलिसांना देऊ.
यात छोटी भाभी, बडी भाभी सर्वकाही येईल. कारण नसताना आमच्या अंगावर दगड मारण्याचा प्रयत्न कराल, त्या वेळेस तुमचीदेखील डोकी फुटतील. राजकारण- समाजकारणामध्ये काही पथ्य पाळायचे असतात, आम्ही ती पाळतो.
मकाऊबाबत चुकीची माहिती
मकाऊमध्ये ज्या कुणी व्हिडिओ काढला तो चुकीचा आहे का, असा सवाल करताना बडगुजर यांचा काहीही संबंध नाही. व्हिडिओ देणारे भाजपचे लोक होते. अजूनही बरेच बाहेर यायचे आहे. आमचा संयम आहे म्हणून आम्ही बऱ्याच गोष्टी खुल्या केलेल्या नाहीत.
याविषयाशी त्यांचा काहीही संबंध नाही. आमच्या हातात सत्ता आहे आम्ही काहीही करू शकतो, राजकीय विरोधकांची कशी अडवणूक करू शकतो, असे धोरण आहे. सलीम कुत्ता भाजपमध्ये गेला तर सर्व साफ होईल. भाजपच्या वॉशिंग मशिनमध्ये टाकल्यास सर्व स्वच्छ होईल, असेही ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.