Nashik Sanjay Raut : त्र्यंबकेश्‍वरची शांतता अबाधित राहावयास हवी : संजय राऊत

sanjay raut
sanjay rautesakal
Updated on

Nashik Sanjay Raut : त्र्यंबकेश्‍वर हे धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळ आहे. इथली शांतता अबाधित राहावयास हवी, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज येथे स्पष्ट केले.

तसेच त्यासाठी सगळ्यांनी खबरदारी घेतली पाहिजे, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. (Sanjay Raut statement about Trimbakeshwar temple peace nashik news)

श्री. राऊत हे त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी आले होते. शहरात सकाळी साडेअकराला आगमन होताच, स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्यांचे ढोल-ताशाच्या निनादात स्वागत केले. त्यांच्यासमवेत जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी महापौर विनायक पांडे, माजी आमदार वसंतराव गिते आदी उपस्थित होते.

शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन दीक्षित यांनी स्वागत केले. ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्यावर मंदिराच्या कोठी हॉलमध्ये विश्‍वस्त प्रशांत गायधनी, संतोष कदम यांनी श्री. राऊत यांचा सत्कार केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

sanjay raut
Twitt On Sanjay Raut : 'जागे व्हा नाहीतर जनतेची थुंकी झेला', आमदार राजू पाटील यांची शिवसेनेला चपराक

पश्‍चिम द्वारालगत पत्रकारांच्या प्रश्‍नाला श्री. राऊत यांनी उत्तरे दिली. अन्य धर्मियांनी धूप दाखवण्याचा मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.

त्यावर शंभर वर्षांची परंपरा असल्याचा मुद्दा आपण मांडला होता, त्याबद्दल काय? या पत्रकारांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना श्री. राऊत यांनी आमच्या काही आदिवासी बांधव आणि कार्यकर्त्यांनी ते सांगितले असल्याची माहिती दिली.

sanjay raut
Sanjay Shirsat यांचे धक्कादायक वक्तव्य, Sanjay Raut यांच्याकडून एका महिलेला मुल?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.