मालेगाव (जि. नाशिक) : कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी एकसंघ महाराष्ट्र व मुंबईसाठी सत्तेवर पाणी सोडले. याउलट राज्यातील ४० गद्दारांनी सत्तेसाठी पक्ष सोडला. उत्तर महाराष्ट्राचे केंद्र असलेल्या व स्वाभिमानी बाणा असलेल्या कर्मवीर भाऊसाहेबांच्या कर्मभुमीतूनच राज्याला उद्धव ठाकरे संदेश देतील.
उद्याचे भविष्य शिवसेनेचे आहे. उत्तर महाराष्ट्रातील महानगरपालिका, आमदार, खासदार विजयी करण्यासाठी उपनेते अद्वय हिरे परिश्रम घेतील. त्यांच्या परिश्रमाला यश येईल असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी येथे व्यक्त केला. (Sanjay Raut statement will give message to state only from self respecting work ground nashik political news)
येथील मसगा महाविद्यालयाच्या सभागृहात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या २६ मार्चला होणाऱ्या जाहीर सभेच्या तयारीच्या आढाव्यासाठी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपनेते सुनील बागुल, अद्वय हिरे, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जयंत दिंडे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, पवन ठाकरे, लकी खैरनार, काशिनाथ पवार, अशोक आखाडे आदी व्यासपीठावर होते.
श्री. राऊत म्हणाले, शहरातील मुस्लिम बांधवांनी शिवसेनेवर प्रेम दर्शविले. २६ मार्चच्या उद्धव ठाकरे यांच्या सभेचे सर्व नियोजन अद्वय हिरे करत आहेत. त्यांना बळ देण्यासाठी आलो आहे. वाईटातून चांगलं घडले आणि हिरे आपणाला मिळाले. भाऊसाहेबांनी राज्याचे नेतृत्व केले. आता ही जबाबदारी अद्वयवर आली आहे.
हे सरकार औटघटकेचे आहे. शिवसेनेवरील आघात हा राज्यातील जनतेच्या स्वाभिमानावर आघात आहे. खेडनंतर मालेगावात सभा होत आहे. उद्धव ठाकरे हे येथे कोणाला पाडण्यासाठी नव्हे तर गद्दारांना गाडण्यासाठी येत आहेत.
पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर टिका करताना त्यांनी ज्या राज्याने हरितक्रांती केली. त्या राज्याचे महत्त्वाचे कृषिमंत्री पद त्यांना दिले. मात्र त्यांनी सारखी खाते बदलून द्या ही रट लावली. त्यांनी काम करण्याची संधी गमावली.
हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?
श्री. हिरे म्हणाले, की उद्धव ठाकरे यांची सभा न भूतो न भविष्य अशी होईल. मुळचे सर्व शिवसैनिक आमच्या समवेत आहेत. आदित्य ठाकरे यांना येथील नेतृत्व द्या. त्यांना येथून खासदार म्हणून विजयी करू. राज्याने व महाविकास आघाडीने ठाकरे यांचे नेतृत्व
मान्य केले आहे. शिवसेनेतून ४० गद्दार गेले ते चांगले झाले. दोन पावले मागे गेल्याने नव्या जोमाने शिवसेना पुढे आली आहे. मला संधी द्या. मी आमदार झाल्यास प्रत्येक शेतात पाणी खेळेल. माझ्याकडे विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार आहे. पालकमंञ्यांची किव करावीशी वाटते. ज्या संस्थेने हजारो विद्यार्थी घडविले त्यांची मुले ज्या संस्थेत शिकली त्या संस्थेच्या जागा खाली करण्याचे निवेदन ते देत आहेत. कार्यकर्ता मेळाव्याला मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मालेगावची जागा शिवसेनाच लढवणार
राज्यात महाविकास आघाडी असली तरी मालेगावची जागा शिवसेनेची आहे. या जागेवर शिवसेनाच लढणार. अद्वय हिरे हे उमेदवार असणार. राज्यात युवानेते आदित्य ठाकरे यांच्यासह जी नवी पिढी चमकते त्यात अद्वय हिरे आघाडीवर असतील.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.