Sanskrit Rajya Natya Spardha : संस्कृत राज्य नाट्यस्पर्धेची सांगता; 15 एकांकिकांचे सादरीकरण

sanskrit rajya natya spardha
sanskrit rajya natya spardhaesakal
Updated on

नाशिक : येथील परशुराम साईखेडकर नाट्यगृहात ६१ वी महाराष्ट्र राज्य संस्कृत नाट्यस्पर्धा मोठ्या जल्लोषात सुरू आहे. गुरुवारी (ता. २) स्पर्धेत ४ एकांकिकाच्या सादरीकरणांनी स्पर्धेची सांगता झाली. (sanskrit rajya natya spardha concluded with 4 one act performance nashik news)

सुरवातीला सिद्धेश्‍वर संस्थान नाशिकतर्फे ‘खन्जमयूरः’ ही एकांकिका सादर झाली. दिग्पाल लांजेकर लिखित या एकांकिकेचा अनुवाद रुचिता पंचभाई यांनी केला. तन्मय भोळे यांनी दिग्दर्शन केले.

रुचिता पंचभाई, तन्मय भोळे, जयेश जोशी या कलाकारांनी भूमिका साकारल्या. स्वरांजली गुंजाळ यांनी वेशभूषा, रंगभूषा आणि नेपथ्य साकारले तर मुग्धा जेऊरकर, गौरव डव्हाण, जयेश जोशी, नेहा कोठावदे यांनी नेपथ्य साहाय्य केले. चैतन्य गायधनी यांनी प्रकाशयोजना , तर नितीन पावरा यांनी संगीत संयोजन केले. यानंतर ब्राह्मण संघ, भुसावळतर्फे ‘मृत्यूःजन्मस्य’ ही एकांकिका सादर झाले.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

sanskrit rajya natya spardha
Nashik News: जागरूक पालक-सुदृढ बालक अभियान; जिल्ह्यातील 13 लाखांवर बालकांची आरोग्य तपासणी

रमाकांत भालेराव यांनी लेखन आणि दिग्दर्शन केले. वल्लभ कुलकर्णी, वैभव पुराणिक, संदीप पाचंगे, विजय जोशी या कलावंतांनी भूमिका साकारल्या. कुमुदिनी फेगडे यांनी नेपथ्य, तर प्रथमेश जोशी यांनी प्रकाशयोजना साकारली. शंभु गोडबोले, प्रवीण ओहोळ यांनी संगीत दिले. चारू भालेराव यांनी रंगभूषा तर संजय बोचरे यांनी रंगमंच व्यवस्था साकारली.

दुपारच्या सत्रात महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंडतर्फे ‘यमदूती’ ही एकांकिका सादर झाली. प्रभाकर भातखंडे लिखित या एकांकिकेचे दिग्दर्शन आनंद केळकर यांनी केले. यानंतर झपूर्झा सोशल फाउंडेशन, परभणीतर्फे चिरंजीव ही एकांकिका सादर झाली. विनोद डावरे लिखित अन् दिग्दर्शित या एकांकिकेचा संस्कृत अनुवाद अर्चना डावरे यांनी केला.

sanskrit rajya natya spardha
Nashik News : डिजिटल करन्सी विरोधाला राष्ट्रीय बळ! मातब्बर 10 संघटनांचा सहभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()