Nashik News : संत गाडगे महाराज पुलाचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट!

Gadge Maharaj Pool
Gadge Maharaj Poolesakal
Updated on

नाशिक : आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर स्मार्टसिटी कंपनीकडून संत गाडगे महाराज पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे असून, मुंबईच्या व्हीजेआयटी संस्थेला हे काम केले जाणार आहे. २० एप्रिलला सदर पथक ऑडिटसाठी नाशिकमध्ये दाखल होणार आहे.

महापालिका हद्दीतून वाहणाऱ्या गोदावरी नदीवर एकूण नऊ पूल आहे. त्यातील अहिल्यादेवी होळकर, रामसेतू व संत गाडगे महाराज हे जुने पूल आहेत. त्यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कन्नमवार पूल तोडून त्यावर नवीन पुलाची उभारणी केली आहे. (Sant Gadge Maharaj bridge will be structural audit Nashik News)

यंदाच्या पावसाळ्यात गोदावरी नदीला मोठा पूर आल्यानंतर काही पुलांना तडे गेल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे स्मार्टसिटी कंपनीकडून पुलांचे ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबईच्या वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूट (व्हीजेटीआय) च्या वतीने व्हिक्टोरिया व रामसेतू पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले.

त्यात दोन्ही पूल वापरण्यायोग्य असल्याचा अहवाल स्मार्टसिटी कंपनी व महापालिकेला सादर करण्यात आला. पुलाच्या संदर्भात असलेली किरकोळ दुरुस्तीदेखील करण्याच्या सूचना अहवालात होत्या.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

Gadge Maharaj Pool
Narhari Zirwal : कलावंतांनी संघटित होणे काळाची गरज : नरहरी झिरवाळ

किरकोळ दुरुस्ती करण्यात आली. आता स्मार्टसिटी कंपनीकडून गाडगे महाराज पुलाचे ऑडिट केले जाणार आहे. त्यासाठी २० एप्रिलनंतर व्हीजेटीआयचे पथक नाशिकला येणार आहे.

"रामसेतू पूल व अहिल्यादेवी होळकर पुलाचे यापूर्वीच ऑडिट झालेले आहे. माजी नगरसेवक शाहू खैरे यांच्या मागणीनुसार संत गाडगे महाराज पुलाचेही स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे." - सुमंत मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्टसिटी कंपनी.

Gadge Maharaj Pool
Dr. Bharati Pawar : राज्य सरकारने घ्यावा मास्कबाबत निर्णय : डॉ. भारती पवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.