Sant Nivruttinath Palakhi : आषाढी एकादशीसाठी निवृत्तिनाथांच्या वारीचे प्रस्थान त्र्यंबकेश्वर येथून शुक्रवारी (ता.२) पंढरपूरसाठी झाले. या वारीसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दरवर्षी आरोग्य विभागाकडून आरोग्य पथक देण्यात येते. (Sant Nivruttinath palkhi 15 member health team nashik news)
यंदाही १५ अधिकारी, कर्मचाऱ्यांचे विशेष महिला वैद्यकीय पथक देण्यात आले आहे. तसेच तीन रुग्णवाहिका वारकऱ्यांच्या दिमतीला असणार आहे.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वारकऱ्यांसाठी दरवर्षी आरोग्य पथक सेवेसाठी दिले जाते. दरवर्षी साधारण तीन ते चार वैद्यकीयधिकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे हे पथक असते. मात्र, यंदा १५ अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक पाठविण्यात आले आहे. यामध्ये आरोग्य अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, सुपरवायझर, शिपाई, वाहनचालक यासोबतच विशेष तीन रुग्णवाहिका यांचा समावेश करण्यात आला आहे.
हे पथक वारकऱ्यांसोबत सतत असणार आहे. या दरम्यान आपत्कालीन म्हणून रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली असून दिंडीतील वारकऱ्यांना काही त्रास जाणवला तर तत्काळ जवळपास असलेल्या रुग्णालयात उपचार दिले जाणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने यंदा वारीसाठी पुरेपुर काळजी घेतली आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
निधीत वाढ
त्र्यंबकेश्वर वारीसाठी जिल्हा परिषदेच्या सेस मधून ४ लाख रुपयांची तरतूद दरवर्षी केली जाते. यंदा मात्र, या वारीसाठी जिल्हा प्रशासनाने जिल्हा नियोजन निधीमधून सुमारे ३० लाख रुपयांची तरतूद केली आहे. या निधीतून प्रामुख्याने वारीतील लोकांना पिण्याचे पाणी मिळावे, तसेच मोबाईल टॉयलेट ची व्यवस्था करण्यात आली आहे.
असे आहेत पथक
१ मुख्य वैद्यकीय अधिकारी
२ समुदाय वैद्यकीय अधिकारी
३ पुरुष सुपरवायझर
२ महिला सुपरवायझर
२ औषधनिर्माता
२ शिपाई
३ वाहनचालक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.