Sant Nivruttinath Palkhi : दीड महिन्यांनंतरही वारकऱ्यांचा उत्साह कायम! निवृत्तीनाथांच्या दिंडीचे चिंचोलीत आगमन

Nivrittinath's foot procession arrived at Chincholi in Sinnar taluka after about fifteen days on its way back from Pandharpur after Ashadhi on foot.
Nivrittinath's foot procession arrived at Chincholi in Sinnar taluka after about fifteen days on its way back from Pandharpur after Ashadhi on foot. esakal
Updated on

Sant Nivruttinath Palkhi : अवघ्या वैष्णवांचे माहेर असलेल्या पंढरपूरात आषाढी एकादशीच्या महापर्वावर लाखो वारकरी भाविकांनी पांडुरंगाचे दर्शन घेतले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडोंच्या पायी दिंड्या पंढरीत दाखल झाल्या होत्या.

वाखरीच्या रिंगणसोहळ्यानंतर चंद्रभागेत स्नान आणि पुंडलिकाच्या दर्शनानंतर पौर्णिमेला काल्याचा महाप्रसाद घेवून ३ जुलैला निवृत्तीनाथांच्या पायी दिंडीचा परतीचा प्रवास सुरु झाला होता. (Sant Nivruttinath Palkhi Arrival of Nivruttinath Dindi in Chincholi nashik news)

ऊन, वारा पावसाची तमा न बाळगता विठूनामाचा गजर करीत तब्बल पंधरा दिवसाच्या प्रवासानंतर सिन्नर तालुक्यातील चिंचोलीत दुपारचे भोजनासाठी दिंडी थांबली होती.

पूजा विधी, भजन अन आरतीनंतर महाप्रसाद झाला. ज्ञानोबा-तुकोबाचा गजर करीत दिंडी पुन्हा मार्गस्थ झाली. आज दिंडीचा चेहडी येथे विसावा आहे. तुळशीवृंदावन घेतलेल्या महिला खांद्यावर पताका घेतलेले वारकरी टाळकरी, भालदार, चोपदार, पखवाज वादक अशाप्रकारे पाचशेहून अधिक वारकरी भाविक दिंडीत सहभागी झाले आहेत.

पंढरीचा वास चंद्रभागे स्नान हेचि मज घडो जन्म जन्मांतरी’ असा कृतज्ञतेचा भाव सकल वारकऱ्यांच्या मनामध्ये रुंजी घालत होता. आषाढीच्या दीड महिन्याच्या पायी दिंडीत वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर यत्किंचितही सीनभाग जाणवत नव्हता. अगदी प्रसन्न मनाने वारकरी भक्तीसोहळ्यानंतरच्या परतीच्या प्रवासात तल्लीन झाले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nivrittinath's foot procession arrived at Chincholi in Sinnar taluka after about fifteen days on its way back from Pandharpur after Ashadhi on foot.
Sant Tukaram Palkhi : संत तुकोबारायांच्या पालखीचे चौफुला, वाखारी येथे स्वागत

"नगरप्रदक्षिणेनंतर एक जुलैला शनिवारी बहुतेक पालख्या परत निघाल्या, परंतु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची पालखी पुनवेची लाही घेतल्याखेरीज माघारी जात नसल्याची जुनी परंपरा आहे. त्यानुसार पौर्णिमेला काल्याच्या प्रसादानंतर ३ जुलैला पालखीचे प्रस्थान होणार आहे.

सतरा दिवसांचा परतीचा प्रवास करुन २० जुलैला पालखी त्र्यंबकेश्वर नगरीत पोहोचणार आहे. सर्व वारकऱ्यांच्या तसेच विश्वस्तांच्या सहकार्याने आषाढी पायी दिंडी सोहळा निर्विघ्नपणे पार पडला आहे. त्यामुळे ट्रस्टतर्फे सर्व वारकरी भाविकांचे वैष्णवांचे आभार मानतो." - नीलेश गाढवे पाटील, अध्यक्ष, निवृत्तीनाथ मंदिर ट्रस्ट त्र्यंबकेश्वर.

Nivrittinath's foot procession arrived at Chincholi in Sinnar taluka after about fifteen days on its way back from Pandharpur after Ashadhi on foot.
Shri Sant Gajanan Maharaj : हजारोंच्या उपस्थितीत श्रींच्या पालखीचे बुलडाणा जिल्हात आगमन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.