Sant Nivruttinath Palakhi : वरुणराजाने केला निवृत्तिनाथांच्या पादुकांवर जलाभिषेक! वारकरी चिंब...

President, trustees and dignitaries of the Institute while welcoming the palanquin ceremony of Saint Shrestha Nivrittinath's return on Thursday.
President, trustees and dignitaries of the Institute while welcoming the palanquin ceremony of Saint Shrestha Nivrittinath's return on Thursday. esakal
Updated on

Sant Nivruttinath Palakhi : ‘पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ, सांभाळले अनाथा केला निळा पावन’ हा संत निळोबारायांचा अभंग म्हणत आज पंढरपूर येथून निघालेल्या संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांच्या पालखीने त्र्यंबकेश्वरनगरीत प्रवेश केला.

रिमझिम पावसाच्या संततधार सरींनी त्र्यंबकेश्वर नगरीत आगमन केलेल्या निवृत्तिनाथांच्या पादुकांवर जलाभिषेक केला. (sant Nivruttinath palkhi enters Trimbakeshwar nashik news)

परतीच्या प्रवासाने थकल्या-भागल्या वारकऱ्यांचा आनंद यामुळे द्विगुणित झाला. संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांचे गुरू गहिनीनाथ यांच्या समाधीस्थानाजवळ महानिर्वाणी आखाड्यात नाथांच्या पालखीचे साधू-महंतांच्या उपस्थितीत पूजन झाले.

या वेळी त्र्यंबकेश्वरच्या उपनगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार यांनी पालखीचे यथोचित स्वागत केले. त्र्यंबकेश्वर येथील स्थानिक नागरिक व उपसमिती सदस्य बाळासाहेब पाचोरकर आदी उपस्थित होते.

संस्थानचे अध्यक्ष नीलेश गाढवे-पाटील, पालखीप्रमुख नारायण मुठाळ, जयंत महाराज गोसावी, सचिव सोमनाथ घोटेकर, विश्वस्त तथा प्रसिद्धीप्रमुख अमर ठोंबरे, एन. डी. गंगापुत्र, विश्वस्त माधवदास राठी, कांचन जगताप, पालखीचे मानकरी बाळकृष्ण महाराज डावरे आदी या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

President, trustees and dignitaries of the Institute while welcoming the palanquin ceremony of Saint Shrestha Nivrittinath's return on Thursday.
Muharram 2023 : ताजिया स्थापनेची 305 वर्षांची परंपरा; सय्यद कुटुंबीयांकडून जोपासना

त्र्यंबकेश्वरच्या स्थानिक नागरिकांकडून पालखीचे औपचारिक स्वागत झाल्यावर त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी पादुका नेण्यात आल्या. त्र्यंबकराजाच्या चरणांवर पादुका ठेवल्यावर त्या ठिकाणी आरती व अभंग झाल्यावर कुशावर्त तीर्थ येथे पादुकांना जलाभिषेक करण्यात आला.

‘दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी’ हा अभंग म्हणत तसेच निवृत्तिनाथांची आरती होऊन पालखी पुढे नाथांच्या मंदिराकडे मार्गस्थ झाली. निवृत्तिनाथांच्या समाधी मंदिराजवळ वारकऱ्यांनी ‘ज्ञानोबा तुकाराम... ज्ञानोबा तुकाराम... ज्ञानोबा तुकाराम’ असा गजर करीत भजन केले. सुमारे एक हजार वारकरी या परतीच्या सोहळ्यासाठी उपस्थित होते. निवृत्तिनाथांच्या पालखीचा परतीचा प्रवास हा पालखीच्या प्रस्थानाप्रमाणेच एक आनंद सोहळा असतो.

हा परतीचा सुख सोहळा अनुभवण्यासाठी त्र्यंबकेश्वरच्या स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. ४६ दिवसांचा हा प्रवास करून निवृत्तिनाथ आज समाधिस्थानावर विसावले आहेत. नाथांच्या पादुका सभामंडपात आल्यावर त्या ठिकाणी ‘सकलही तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे बुडी घेई माझे मना आता न करी भ्रांतीचे भ्रमण’ असा अभंग म्हणत पांडुरंगाची आरती तसेच निवृत्तिनाथांच्या आरतीने परतीच्या प्रवासाची सांगता झाली.

President, trustees and dignitaries of the Institute while welcoming the palanquin ceremony of Saint Shrestha Nivrittinath's return on Thursday.
Sant Nivruttinath Palkhi : दीड महिन्यांनंतरही वारकऱ्यांचा उत्साह कायम! निवृत्तीनाथांच्या दिंडीचे चिंचोलीत आगमन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.