Sant Nivruttinath Palakhi : वारकऱ्यांच्या सेवेतून मिळतो आत्मानंद अन समाधान!

sukhdev khade and Students of Dr. Naikwadi College of Nursing
sukhdev khade and Students of Dr. Naikwadi College of Nursingesakal
Updated on

Sant Nivruttinath Palakhi : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ पायी दिंडी सोहळ्याने आज सकाळी श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथून प्रस्थान ठेवल्यावर सोहळा आज राहुरी येथे मुक्कामी आहे. याठिकाणी सोहळ्याला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले असून वारकऱ्यांसह स्थानिकांत मोठा उत्साह आहे.

दरम्यान गेल्या दहा अकरा दिवसांपासून वारीत सहभागी झालेल्यांवर औषधोपचारासह मालिशचे काम सिन्नरच्या डॉ. नाईकवडी नर्सिंग महाविद्यालयाचे पन्नास विद्यार्थी प्रामाणिकपणे करत आहेत. (sant nivruttinath palkhi Sinners Medicine along with message from dr Naikwadi Nursing College nashik news)

पालखी सोहळ्याचा अकरावा मुक्काम आज (ता.१२) राहुरी येथे राहिला. याअकरा दिवसांत अनेक ज्येष्ठांचे भर उन्हात चालण्याने हातपाय दुखू लागले आहेत. अशा ज्येष्ठांची सेवा सिन्नर येथील डॉ. नाईकवडी नर्सिंग महाविद्यालयाचे पन्नास विद्यार्थी पुढे सरसावले आहेत. वारकऱ्यांच्या सेवेतून आत्मानंद व समाधान मिळत असल्याचे या विद्यार्थ्यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

हे विद्यार्थी ज्येष्ठांच्या औषधोपचारासह मसाजचेही काम पाहात आहेत. यात संस्थेचे चेअरमन रामदास नाईकवडी, व्हाइस चेअरमन वैशाली नाईकवडी, प्राचार्य एम. आर. पाटील श्रीकांत कुंभार, सोमनाथ बिराजदार यांच्यासह संस्थेचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत. ही सेवा थेट पंढरपूरपर्यंत पुरविण्याचा निर्धार श्री. नाईकवडी व त्यांच्या महाविद्यालयाने व्यक्त केला आहे.

दिंडीच्या मुक्कामाच्या ठिकाणी दुपारी चारपासून ते रात्री दहापर्यंत हे पथक वारकऱ्यांच्या मालिश करून सेवा देत आहेत. यात सिन्नर येथील माजी आमदार राजाभाऊ वाजे यांची पाठविलेली रुग्णवाहिकाही मोलाची भूमिका बजावत असल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले. यात जणांचा टीचर्स स्टाफही सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

sukhdev khade and Students of Dr. Naikwadi College of Nursing
Ashadhi Wari 2023: धावपळीच्या जगातही सुट्या टाकून कार्यकर्ते वारकऱ्यांच्या सेवेसाठी

आदिवासी चालीवर भजन

पालखी सोहळ्याने आज श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथून आपला मुक्काम राहुरी येथे ठेवला आहे. कडक उन्हातही वारकऱ्यांचा उत्साह तसूभरही ढळलेला नाही, हे विशेष. पालखीसोबतच्या वेगवेगळ्या दिंड्या आपले वेगळेपणही जपत आहे. नाशिक तालुक्यातील हभप बापूबाबा देवगावकर यांची दिंडीत त्यात आपले वेगळेपण जपत आहे.

आदिवासी भागातील वारकरी आपल्या आदिवासी चालींवर व ठेक्यावर विविध भजने गाऊन आपल्याकडे लक्ष वेधून घेत आहेत. विशेष म्हणजे या दिंडीत महिला, मुली व मुलांचा मोठा सहभाग आहे. सेवानिवृत्त पोलिस निरिक्षक हभप सुखदेव खाडे हे या दिंडीचे नेतृत्व करत आहेत. मागील अनेक वर्षांपासून या दिंडीने आपले वेगळेपण जपल्याचे श्री. खाडे यांनी सांगितले.

sukhdev khade and Students of Dr. Naikwadi College of Nursing
Ashadhi Wari : पंढरीची आस...पर्यावरणाचा ध्यास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.