Nashik News : संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांची पौषवारी रविवार (ता. ४)पासून शुक्रवार (ता. ९)पर्यंत अर्थात नवमी ते चतुर्दशी या कालावधीत होत आहे. निवृत्तिनाथांच्या जन्म सप्तशतकोत्तरी वर्षाचे औचित्य साधून गेल्या वर्षापासूनच वेगवेगळे उपक्रम संस्थानतर्फे हाती घेण्यात आले.
यंदाच्या पौषवारी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संत निवृत्तिनाथ समाधी मंदिराच्या दगडी सभामंडपाची पायाभरणी झाली असून, उर्वरित कामही लवकरच पूर्णत्वास येणार आहे. (Sant Shrestha Nivrittinath Maharaj Paush Yatrotsav from tomorrow in nashik news)
रविवारी पहाटे पाचला काकडा पूजनाने व नित्य आरतीने उत्सवाला सुरवात होत आहे. सकाळी सातपासून सायंकाळी सातपर्यंत महाराष्ट्राच्या विविध भागांतून येणाऱ्या दिंड्या आणि पालख्यांचे, संत-महंतांचे स्वागत निवृत्तिनाथ संस्थानतर्फे करण्यात येणार आहे. या कालावधीत सायंकाळी सात ते रात्री आठ हरिपाठ, तसेच आठ ते दहापर्यंत परंपरेची कीर्तनसेवा पार पडेल.
मंगळवारी (ता. ६) पहाटे चारला संत निवृत्तिनाथांच्या संजीवन समाधीची शासकीय महापूजा होणार आहे. दुपारी चार ते सायंकाळी सात या वेळेत यात्रोत्सवाच्या परंपरेप्रमाणे संत निवृत्तिनाथांच्या रथाची नगरप्रदक्षिणा होईल. ज्योतिर्लिंग त्र्यंबकराज व संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ भेट परंपरेप्रमाणे होईल.
याचवेळी तीर्थराज कुशावर्त येथे नाथांच्या पादुकांवर जलाभिषेक करण्यात येईल. गुरुवारी (ता. ८) काल्याचे कीर्तन होणार आहे. याच दिवशी संस्थानतर्फे आलेल्या दिंड्या-पालख्यांना मानाचा नारळ प्रसाद देण्यात येईल. शुक्रवारी (ता. ९) अर्थात चतुर्दशीच्या दिवशी प्रक्षालन पूजेने निवृत्तिनाथ यात्रोत्सवाची सांगता होणार आहे. स्थानावर ते भेट देणार आहेत.
पौषवारीनिमित्त रमेश महाराज, मोहन महाराज, बाळासाहेब महाराज, रामकृष्ण महाराज यांच्या कीर्तनसेवा होतील. गुरुवारी काल्याच्या कीर्तनाने समाप्ती होईल. पौषवारीसाठी त्र्यंबक पालिका, तसेच पोलिस प्रशासन यांनी यापूर्वी निवृत्तिनाथ संस्थानच्या विश्वस्त मंडळाशी चर्चा, बैठका व विचारविनिमय करण्यात आला.
येणारा यात्रोत्सव निर्विघ्न पार पाडावा, असे आवाहन निवृत्तिनाथ संस्थानतर्फे अध्यक्ष नीलेश गाढवे, सचिव ॲड. सोमनाथ घोटेकर, प्रसिद्धीप्रमुख तथा विश्वस्त अमर ठोंबरे, पालखीप्रमुख नारायण मुठाळ, विश्वस्त माधवदास महाराज राठी, श्रीपाद महाराज कुलकर्णी, राहुल महाराज साळुंखे, नवनाथ महाराज गांगुर्डे, जयंत महाराज गोसावी, योगेश महाराज गोसावी, तसेच कांचनताई जगताप आदींनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.