राजवंश भारती : गुप्त वंश

Marathi Article : हूणांच्या वावटळीपुढे बलाढ्य अशी रोमन आणि पर्शियन साम्राज्येही टिकली नव्हती. अशा हूणांना सम्राट स्कंदगुप्तने आपल्या पराक्रमाने भारतातून अक्षरश: हाकलून लावले.
A gold coin of Skandagupta
A gold coin of Skandaguptaesakal
Updated on

लेखक : ॲड. सुशील अत्रे

हूणांच्या वावटळीपुढे बलाढ्य अशी रोमन आणि पर्शियन साम्राज्येही टिकली नव्हती. अशा हूणांना सम्राट स्कंदगुप्तने आपल्या पराक्रमाने भारतातून अक्षरश: हाकलून लावले. त्याचे हिंदुस्थानावर अनंत उपकार आहेत; अन्यथा आज आपण एका रानटी टोळीचे दास, गुलाम राहिलो असतो. मात्र, या अखंड युद्धसदृश परिस्थितीमुळे गुप्त साम्राज्य आर्थिकदृष्ट्या जेरीला आले. खजिना सतत रिकामा होत राहिला. एका अर्थाने भारताने ती स्वातंत्र्याची किंमत चुकती केली. (saptarang latest article on Rajvansh Bharti Gupta dynasty)

गुप्त राजवट कीर्तिशिखरावर असताना ‘विक्रमादित्य’ चंद्रगुप्तचा इ. स. ४१३ ते ४१५ च्या दरम्यान कधीतरी मृत्यू झाला. नंतर त्याचा मुलगा कुमारगुप्त गादीवर आला. तो बहुधा इ. स. ४१५ मध्ये सम्राट बनला. चंद्रगुप्तच्या लोककथांमधे प्रसिद्ध असलेली ‘ध्रुवराणी’ ही कुमारगुप्तची आई. आपल्या दिगंतकीर्ती पित्याच्या प्रभावळीपुढे त्याची कारकीर्द काहीशी निस्तेज वाटते खरी. तसे पाहिले तर त्याची कारकीर्द ही एक ‘यशस्वी राजवट’ म्हणावी लागेल.

इ. स. ४१५ ते ४५५, असा ४० वर्षांचा प्रदीर्घ कालावधी त्याला मिळाला. यादरम्यान नाव घेण्याजोगे एकही मोठे युद्ध त्याने केल्याचा उल्लेख आढळत नाही. पण, याचाच दुसरा अर्थ असा, की त्याचे प्रशासन आणि राजकारण इतके प्रभावी होते, की एवढ्या मोठ्या काळात एकही मोठे आक्रमण किंवा अंतर्गत बंडाळी झाली नाही. किरकोळ लढाया झाल्या, तेवढ्याच.

शिवाय साम्राज्याचा कोणताही भाग शत्रूने बळकावला नाही; कमी झाला नाही. शक-कुशाणांसारखे पिढीजात शत्रू आजूबाजूला वावरत असताना सलग ४० वर्षे निर्वेध राज्य करणे, हाच एक मोठा राजनैतिक विजय आहे! त्या काळात आधीच्या पिढीने मिळवलेले, जोडलेले राज्य अबाधित ठेवणे, तुकडे होऊ न देणे हीच तारेवरची कसरत होती. ती कुमारगुप्तने अगदी यशस्वीपणे पार पाडली. त्याने स्वत:ची १४ प्रकारची सोन्याची नाणी पाडली होती.

चलनी नाण्याला कुशाण ‘दीनार’ हा शब्द वापरीत होते, तोच गुप्तनेही प्रचलित केला. गुप्तंच्या सुवर्णमुद्रांचा उल्लेख ‘दीनार’ असा सापडतो. विशेष म्हणजे मध्यपूर्वेतील आखाती देशांमध्ये आजही चलनाला ‘दीनार’ हा शब्द वापरला जातो. कुमारगुप्तच्या कारकीर्दीच्या अखेरीस मात्र ‘पुष्यमित्र’ नावाच्या मध्य भारतातील एका जमातीने उठाव केला. शिवाय शक-कुशाणांच्या जोडीने त्यांच्यापेक्षाही क्रूर आणि रानटी टोळीची आक्रमणे भारतावर सुरू झाली. (latest marathi news)

A gold coin of Skandagupta
राजवंश भारती : सातवाहन‌ वंश
स्तंभावरचा ब्राह्मी लिपीतील लेख
स्तंभावरचा ब्राह्मी लिपीतील लेखesakal

त्यांचे नाव ‘हूण’...मंगोल वंशाचे हूण! ‘ॲटिला’ नावाचा त्यांचा प्रमुख होता. एखाद्या टोळधाडीप्रमाणे हे हूण प्रचंड संख्येने राक्षसी आक्रमण करीत आणि तो प्रदेश लुटून अक्षरश: बेचिराख करीत. सारे जग त्यांच्या दहशतीखाली होते. पण, त्यांना भारतात समर्थ प्रतिकार केला, तो गुप्त साम्राज्याने. या सर्व मोहिमांमधे कुमारगुप्तचा आधारस्तंभ होता, त्याचा मुलगा स्कंदगुप्त!

स्कंदगुप्त :

कुमारगुप्त कार्तिकेयाचा भक्त होता. त्यामुळे त्याने आपल्या एका मुलाचे नाव कार्तिकेयाचेच ठेवले. स्कंद. कार्तिकेय जसा देवांचा सेनापती होता, तसा स्कंदगुप्त हा साम्राज्याचा सेनापती होता. तो कमालीचा शूर आणि जातीचा लढवय्या होता. कुमारगुप्तने त्याला इ. स. ४५५ च्या सुमारास ज्या मोहिमेवर पाठवले, तेथून विजयी होऊन तो परतला; पण तोपर्यंत कुमारगुप्तचा मृत्यू झाला होता. तोपर्यंत स्कंदाचा सावत्रभाऊ पुरुगुप्ताने सिंहासन बळकावले होते, असे दिसते.

पण स्कंदगुप्तच्या प्रचंड विजयामुळे जनतेनेच पुरुगुप्ताला हटवून स्कंदगुप्तला सम्राटपदावर बसवले. भिटारी (उत्तर प्रदेश) इथे एक गुप्तकालीन स्तंभ सापडला आहे. तो स्कंदगुप्तने उभा केला आहे. त्यावर संस्कृतमध्ये १९ ओळींमध्ये गुप्तवंशाबद्दल, तसेच स्वत:
स्कंदाबद्दल माहिती कोरली आहे.

त्यावर अशा अर्थाचा एक उल्लेख आहे, की पुष्यमित्रांवरील विजयानंतर स्कंदाने आपल्या मातेला विजयवार्ता सांगितली, जशी कृष्णाने देवकीला सांगितली होती, ती ऐकून त्या मातेच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले, जसे देवकीच्या डोळ्यांत आले होते... स्कंदाचा असाच आणखी एक स्तंभ उत्तर प्रदेशातच ‘कहौम’ या ठिकाणीही आढळतो. त्यावर उल्लेख केल्याप्रमाणे तो इ. स. ४६१ मध्ये उभा केला. यावरही ब्राह्मी लिपीत मजकूर आहे. या लेखात स्कंदगुप्तला ‘शंभर राजांचा प्रमुख’ असे म्हटले आहे. (latest marathi news)

A gold coin of Skandagupta
राजवंश भारती : ऐल राजवंश (चंद्रवंश)

स्कंदगुप्त लढाऊ वृत्तीचा होता आणि त्याच्या नशिबातही सतत लढायाच होत्या. इ. स. ४५५ ते ४६७ या १२ वर्षांच्या कारकीर्दीत त्याचा बराचसा काळ युद्धातच गेला. हूणांच्या रानटी टोळ्या गुप्त साम्राज्यावर एकामागोमाग एक असे सतत हल्ले करतच होत्या. प्रत्येक वेळी स्कंदगुप्त त्यांना कापून काढत होता. अखेरीस त्याचे संख्याबळ खूपच कमी झाले, तसे ते पर्शियाकडे निघून गेले. पुढे जवळ जवळ ४० वर्षे त्यांनी भारताकडे वाकड्या नजरेने पाहिले नाही.

यात एक गोष्ट विसरता कामा नये, ती म्हणजे हूणांच्या वावटळीपुढे बलाढ्य अशी रोमन आणि पर्शियन साम्राज्येही टिकली नव्हती. अशा हूणांना सम्राट स्कंदगुप्तने आपल्या पराक्रमाने भारतातून अक्षरश: हाकलून लावले आहे. त्याचे हिंदुस्थानावर अनंत उपकार आहेत; अन्यथा आज आपण एका रानटी टोळीचे दास, गुलाम म्हणून राहिलो असतो.

मात्र, या अखंड युद्धसदृश परिस्थितीमुळे गुप्त साम्राज्य आर्थिकदृष्ट्या जेरीला आले. खजिना सतत रिकामा होत राहिला... एका अर्थाने भारताने ती स्वातंत्र्याची किंमत चुकती केली.
स्कंदगुप्तनंतर गुप्त साम्राज्याला उतरती कळा लागली. सुवर्णकाळ मागे पडला. स्कंदाच्या मृत्यूनंतर बहुधा पुरुगुप्त गादीवर आला. त्याच्यानंतर कुमारगुप्त दुसरा, त्याच्यानंतर पुरुगुप्ताचा मुलगा बुधगुप्त, नरसिंहगुप्त, तिसरा कुमारगुप्त आणि विष्णुगुप्त असे राजे होऊन गेले.

याशिवाय ‘भानुगुप्त’ नावाच्या एका राजाचाही पुसटसा उल्लेख आढळतो. तो कोणाचा कोण, हे मात्र उलगडत नाही. ‘मंजुश्री मूल कल्प’ या बौद्ध ग्रंथात मात्र भानुगुप्तचा उल्लेख आढळतो. पण त्यात त्याचा काळ दिलेला नाही. तथापि, ‘विष्णुगुप्त’ हा या वंशातील अखेरचा राजा होता. सर्वसामान्यपणे गुप्त राजवट इ. स. ५५० पर्यंत होती, असे मानतात. पण डॉ. आर. सी. मुजुमदारांच्या मते ही राजवट इ. स. ५७० पर्यंत सुरू होती.
(उत्तरार्ध)

A gold coin of Skandagupta
राजवंश भारती : नागवंश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.