समाजमन : मैदानी खेळाने सर्वांगीण विकास

आपल्या जीवनात बालपणीचा काळ हा अत्यंत सुखाचा असतो. या काळात होणारी आपली व्यक्तिमत्त्वाची जडणघडण ही भविष्यातील आयुष्याची दिशा ठरवत असते.
Rajaram Pangavane
Rajaram Pangavaneesakal
Updated on

लेखक : राजाराम पानगव्हाणे

आपल्या जीवनात बालपणीचा काळ हा अत्यंत सुखाचा असतो. या काळात होणारी आपली व्यक्तिमत्त्वाची जडणघडण ही भविष्यातील आयुष्याची दिशा ठरवत असते.

आपल्या शरीराची वाढ होत असताना त्याला योग्य पद्धतीने व्यायामाची आवश्यकता असते, पण लहान मुलांनी सुदृढ शरीरासाठी व्यायाम केला पाहिजे, ही समज त्या वयामध्ये कमी असते म्हणूनच त्यांना खेळांकडे आकर्षित केले जाते.

लहान मुले जे खेळतात त्यातून त्यांचा शारीरिक, बौद्धिक व मानसिक विकासही होतो. मैदानी खेळातून एकाग्रता, मानसिक शक्ती, संघभावना, नेतृत्व असे अनेक व्यक्तिमत्त्व कौशल्यासाठी आवश्यक असणारे गुण या माध्यमातून आपल्यामध्ये निर्माण होतात, म्हणून आपल्या जीवनात मैदानी खेळांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. (saptarang latest marathi article by rajaram pangavane All round development through outdoor play nashik news)

बालपणी मैदानी खेळ म्हटले, की कबड्डी, बॅटबॉल, लपंडाव, लगोरी, फुटबॉल, विटी-दांडू, पकडा-पकडी हे खेळ खेळण्यात खूपच मजा येत असे. त्याचप्रमाणे मैदानी खेळामुळे मुले त्यामध्ये रममाण होतात. तहान-भूक हरपून खेळतात.

त्यानंतर मात्र त्यांना भूक लागते व ते योग्य पद्धतीने आहारही घेतात. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी झोप ही अत्यंत महत्त्वाची आहे. पूर्ण झोप तेव्हाच येते जेव्हा आपले शरीर थकते.

मैदानी खेळांमुळे मुले थकतात, जेवणही चांगले करतात व त्यांना झोपही चांगली लागते. यामुळे आजारी पडण्याची शक्यता कमी असते. कारण मैदानी खेळामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती देखील वाढते.

आजकालची पिढी मात्र घरातच बसून मोबाईल गेम अथवा टीव्हीवर गेम खेळताना दिसून येतात. त्यामुळे त्यांच्यात लठ्ठपणादेखील वाढताना दिसून येतो. मानसिकदृष्ट्याही एकलकोंडेपणा मोबाईलमुळे निर्माण होतो.

सतत घरात बसून गेम खेळणे, कुठल्याही प्रकारची जास्त हालचाल न करणे यामुळे त्यांचा लठ्ठपणा तर वाढतो शिवाय त्यांच्या मेंदूचा विकास हादेखील कमी प्रमाणात होतो. हल्ली मुले हे घरातच बसून खेळणे पसंत करतात.

सतत मोबाईलमध्ये गेम खेळत बसणे अन्यथा यूट्यूब चॅनल तरी बघत बसणे यामध्ये वेळ घालवत असतात. त्यामुळे सतत घरात थांबले अन् मैदानी खेळ खेळले नाहीत तर त्यांची उंची देखील वाढणार नाही.

मुलांच्या शारीरिकवाढीस चालना

मैदानी खेळाचे संज्ञानात्मक आणि सामाजिक विकास फायदे अनेक आहेत. जेव्हा मुले घराबाहेर खेळतात तेव्हा त्यांना त्यांच्या सभोवतालचा परिसर शोधण्याची संधी असते.

त्यांना त्यांच्या आजूबाजूच्या जगाबद्दल शिकत असताना त्यांची संज्ञानात्मक कौशल्ये विकसित करण्यास मदत करते. मैदानी खेळामुळे मुलांना इतर मुलांशी आणि प्रौढांसोबत सामील होण्याची संधी मिळते.

त्यांना त्यांची सामाजिक कौशल्ये विकसित करण्यास आणि इतरांशी संवाद कसा साधावा, हे शिकण्यास मदत करते. याव्यतिरिक्त मैदानी खेळामुळे मुलाचे शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.

Rajaram Pangavane
भावना यंत्राच्या ताब्यात!

सर्जनशीलता वाढीस मदत

मैदानी खेळामुळे मुलांना मजबूत स्नायू आणि हाडे विकसित होण्यास मदत होते आणि त्यांचे समन्वय आणि संतुलन सुधारते. धावणे, चढणे आणि मुलाचे हृदयगती आणि फुफ्फुसाची क्षमता वाढविण्यास मदत करतात.

नैसर्गिक वातावरणात खेळ खेळल्यामुळे तणावाची पातळी कमी होते आणि मनःस्थिती सुधारते. जेव्हा मुलांना खेळण्यासाठी घराबाहेर सोडले जाते तेव्हा त्यांना त्यांच्या कल्पनाशक्तीचा अधिक वापर करावा लागतो.

त्यांच्यामध्ये अधिक सर्जनशीलता आणि समस्या सोडविण्याची कौशल्ये वाढवते, जी ते आयुष्यभर त्यांच्यासोबत ठेवू शकतात.

मोबाईलमुळे खेळणे झाले कमी

पूर्वी इलेक्ट्रॉनिक वस्तू कमी प्रमाणात असायच्या. आजकाल तर घरोघरी इलेक्ट्रॉनिक वस्तू आढळून येतात. संगणक, मोबाईल, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन इत्यादी वस्तू तरी आता घरोघरी बघायला मिळतात.

हल्ली तर घरातील लहान मुले हे घराबाहेर पडतच नाही. घरातच बसूनच मोबाईलवर गेम खेळत असतात. आजकाल घरोघरी तुम्हाला लहान मुलांच्या हातात मोबाईल बघायला मिळेल. पूर्वी शाळेतदेखील मैदानी खेळ खेळले जायचे.

आता अनेक शाळांना मैदानच नाही. मुले पूर्वी शाळा सुटल्यानंतर घरी दप्तर ठेवायचे, नंतर लगेच खेळायला जायचे. अगदी जेवण करण्यासाठी देखील आई ओढून घरी न्यायची. मैदानी खेळ खेळण्यात एक वेगळीच मजा असते.

खेळण्यासाठी प्रोत्साहन द्या

मोबाईलचा वापर मर्यादित झाला पाहिजे व त्याची सुरवात सर्वप्रथम पालकांनी केली पाहिजे. आपण आपल्या सवयी बदलल्या तरी त्याचा परिणाम हा आपल्या मुलांवरदेखील होईल. लहान मुले मोबाईल खेळत असतील तर तुम्ही त्यांना मैदानी खेळ खेळण्यास शिकविले पाहिजे.

त्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. स्वतःहून त्यांना मैदानी खेळ खेळवले पाहिजे. शिवाय आजकाल मुलांवर अधिक अभ्यास करण्याचे टेन्शनदेखील असते. पालक त्यांच्यावर अभ्यास करण्याचा जोर देत असतात.

आधी त्यांच्यावर अभ्यास करण्याचे टेंशन असते. शिवाय त्यांच्यावर तुम्ही अजून जर अभ्यासाचा जोर देत असाल, तर त्यामुळे मुलांवर मानसिक ताणतणाव देखील येऊ शकतो.

Rajaram Pangavane
ज्योती झाली ज्वाला!

मैदानी खेळाने बुद्धीला चालना

सध्या मुले टीव्हीमध्ये कार्टून बघण्यात अधिक वेळ घालवतात. मुलांच्या या सवयी बदलणे आपल्या हातात असते. आपण मुलांना योग्य त्या मैदानी खेळांची ओळख करून दिली पाहिजे. मैदानी खेळ खेळल्यामुळे आपल्या शरीराच्या हालचाली होत असतात.

त्यामुळे आपल्या शरीराच्या अवयवांची कार्यक्षमता देखील चांगली वाढण्यास मदत होते. मैदानी खेळांमुळे बुद्धीचा विकास होतो, शिवाय बुद्धीला चालना मिळते, गती मिळते. मैदानी खेळ खेळताना मुले एकत्रित खेळत असतात.

त्यामुळे त्यांच्यामध्ये संघभावना, एकात्मता निर्माण होते. एकोपा राहातो. मैदानी खेळ खेळाल्यामुळे स्पर्धात्मक वृत्ती निर्माण होते. शिवाय आत्मविश्वास वाढण्यास, तसेच जिज्ञासूवृत्ती वाढण्यासही मदत होते.

तरुणांनीही मैदानी खेळ खेळावेत

मैदानी खेळ प्रकार हा लहान मुलांसाठीच नव्हे, तरुण मुलांनीही मैदानी खेळ खेळण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे. मोबाईलच्या जगापलीकडेही हे फार मोठे जग आहे. त्याच्यामधून आपला व्यक्तिमत्त्व विकास निश्चित होतो. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ राखले जाते.

Rajaram Pangavane
बोलू ऐसे...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.