भाषा-संवाद: ऐकण्याची भाषा : मेहनतीने कमवा, सरावाने घडवा...

श्रवण अर्थात ऐकणे ही संवादाची पहिली पायरी आहे.‌.. भाषा ऐकली तर तिच्याशी संवाद साधणे शक्य होईल; त्यानंतर ती कमावता आणि घडविताही येईल.
Language Communication
Language Communicationesakal
Updated on

"बोलणे आणि लिहिणे या भाषेतील सामान्य क्रिया वाटत असल्या, तरी त्यांच्या मुळाशी असते ऐकण्याची भाषा, जी आकार देत असते भाषेच्या घडण्याला किंवा बिघडण्याला... एखाद्या व्यक्तीचे बोलणे इतके सुंदर आणि रसाळ असते, की ते ऐकतच राहावेसे वाटते.

असे का बरे होते..? कारण त्या लेखकाने किंवा वक्त्याने त्याची व्यक्त भाषा ही ऐकण्याच्या बाजूने ‘घडविलेली’ असते. उत्तम वक्ते असे बोलतात, की ऐकणाऱ्याला ते आपलेच बोलणे वाटू लागते.

बोलणाऱ्याचा आवाज जेव्हा ऐकणाऱ्याशी आतून संवाद साधू लागतो, तेव्हा भाषेचे वर्तुळ पूर्ण होत असते. ज्याप्रमाणे एखादा चांगला उमदा खेळाडू शरीराचे सौष्ठव कमावतो, त्याप्रमाणे काही व्यक्ती भाषेसाठीचा आपला आवाज ठरवून कमावतात; म्हणूनच त्यांच्या भाषेचा, आवाजाचा आणि बोलण्याचा सर्वत्र सन्मान होत असतो. भाषेमुळे मनाला आवाजाच्या सौंदर्याची जाणीव होते."

- तृप्ती चावरे-तिजारे

(saptarang latest marathi article by trupti tijare Language Communication Listening Language Earn by hard work build by practice nashik news)

भाषा हे भावना, विचारांबरोबरच आवाजावरील संस्कारांचेही प्रेरणास्थान आहे. व्यक्तिमत्त्वाच्या बाजूने, बाहेरून ‘ठाम’ करणारे आणि प्रतिभेच्या बाजूने ‘आतून’ सुंदर करणारे एक प्रभावी साधन म्हणजे आवाज... म्हणून आपली भाषा ही मेहनतीने कमवायची असेल तर ती आवाजाच्या सरावाने घडविली पाहिजे. स्वतःचा आणि समोरच्याचा आवाज ऐकणे ही त्याची पहिली पायरी.

कधी-कधी बोलताना भाषेची कितीही जुळवाजुळव केली तरी समोरच्यावर तिचा प्रभाव पडत नाही. असे का होते? यात ऐकणाऱ्याचा दोष की ऐकविणाऱ्याचा? ऐकविणाऱ्याचाही असूच शकतो ना? कारण, कदाचित त्याने त्याची भाषा घडविलेली नसते.

नाईलाजाने का होईना, त्याला जेव्हा अशी न घडलेली भाषा वापरावी लागते, तेव्हा त्या भाषेला ‘बिघडलेली भाषा’ असे म्हणायला हरकत नाही; पण मग आपली भाषा घडलेली आहे की बिघडलेली? याचा विवेक करण्याचे सोपे साधन काय? तुकाराम महाराज म्हणतात, ‘आपुलाची वाद आपणाशी’... आपणच आपल्याशी असा वाद करायचा की मग आपलीच भाषा आपल्याशी आपोआप संवाद साधेल.

काही जणांच्या बाबतीत, काही वेळा कदाचित असे होतही असेल; परंतु आपण आपल्याच भाषासंवादाकडे फारसे लक्ष देत नाही, आपल्याला तो ऐकूच येत नाही. श्रवण, मनन, चिंतन आणि कथन अशा क्रमाने भाषासंवाद साधला तर आपल्याला आपल्यातला वादही कळेल आणि संवादही...

Language Communication
भीमबेटका : सृजनात्मक अभिव्यती

श्रवण अर्थात ऐकणे ही संवादाची पहिली पायरी आहे.‌.. भाषा ऐकली तर तिच्याशी संवाद साधणे शक्य होईल; त्यानंतर ती कमावता आणि घडविताही येईल. एक चांगला श्रोताच चांगला वक्ता बनू शकतो.

आपले व्यक्तिमत्त्व ‘दर्शनीय’ असण्याला जितके महत्त्व आहे, तितकेच ते ‘श्रवणीय’ असण्यालाही असावे. सुंदर भावना, सुंदर विचार आणि सुंदर भाषा या त्रिवेणी संगमात स्वसंवाद सुरू होतो. स्वसंवादात व्यक्तिमत्त्व खुलविण्याची कला लपलेली असते.

स्वसंवादात आवाज, रचना आणि मांडणी यांचा आलेख कळतो. स्वसंवाद हा एखाद्या आर्किटेक्टने काढलेल्या संकल्पचित्रासारखा असतो. भव्य भाषानिर्मितीचा तो सुंदर सारांश असतो.

स्वसंवादातून विकसित झालेली भाषा म्हणजेच भाषण आणि संभाषण... सेल्फटॉक अर्थात, स्वसंवाद हा आपल्याला सतत आणि जाणीवपूर्वक करून पाहावा लागतो, तरच भाषेला सौंदर्याचे पैलू पडतात.

समजा, आपण हे भाषासौंदर्य घडविलेच नाही, तर आपले दैनंदिन जीवन काही अडून राहते का? नाही. परंतु, व्यायाम नसलेल्या शरीराला ज्याप्रमाणे व्याधी जडू शकतात, त्याप्रमाणे अशक्त भाषेमुळे मनालाही नकळतच विकारांची व्याधी जडू शकते.

Language Communication
राजवंश भारती : विस्तीर्ण भारतीय कालपट...

अशाने मुळातच संस्काररूपाने शुद्ध असलेले आपले विचार हळूहळू विकारांकडे सरकण्याचा धोका संभवतो. हा धोका ज्याला वेळीच कळतो, तो स्वतःची भाषा घडविण्यासाठी धडपड करू लागतो.

माणूस दिसायला सुंदर आहे हे त्याला ‘आरसा’ सांगतो. मात्र, त्याचे मनही सुंदर आहे, हे व्यक्त करणारा एक भावनेचा आरसाही असतोच की ! हा आरसा म्हणजेच भाषा संवाद नव्हे का? वास्तविक, कोणतीही मातृभाषा ही मुळात सौंदर्याची खाणच असते.

फक्त त्या खाणीतील सोने, त्या भाषेचा कुशल सोनार म्हणजे भाषा वापरणारा ‘भाषिक’ कसे वापरतो, तसेच त्या सोन्यापासून तो स्वतःचे ‘अलंकार’ कसे घडवितो, यावर त्या भाषेतील सौंदर्याचे दर्शन घडत किंवा बिघडत असते.

(क्रमशः)

Language Communication
पसायदान : मानव्याचे उत्कट, भव्य निधान!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.