Saptashrungi Devi Chaitrotsav : खानदेशातून लाखांवर भाविक गडावर; रस्ते भाविकांनी फुलले

the steps of the temple for the darshan of devotees.
the steps of the temple for the darshan of devotees.esakal
Updated on

वणी (जि. नाशिक) : 'सप्तशृंगी माता की जय', ‘अष्टभुजा वाली की जय' चा जयघोष आणि ‘डोंगर हिरवागार, माय तुना डोंगर हिरवागार, जतरा भरनी चैत्र मझार, माय तुना डोंगर हिरवागार‘, ‘मायना गडावर उनी बानू’ अशा अहिराणी देवीच्या गाण्यांवर तालावर आग ओकणाऱ्या उष्णतेची तमा न बाळगता लाखो भाविक गड व परिसरात दाखल झाले आहेत.

अवघा सप्तशृंगगड व गडाकडे येणारे सर्व मार्ग दुमदुमून गेले आहेत. दरम्यान उद्या (ता. ४) मध्यरात्री लाखो भाविकांच्या साक्षीने गडाच्या शिखरावर कीर्तीध्वज फडकणार आहे. दरम्यान आज सुमारे एक लाखांवर भाविकांनी दर्शन घेतले. (Saptashrungi Devi Chaitrotsav Lakhs from Khandesh to gad nashik news)

खानदेशाची माहेरवासिन समजल्या जाणाऱ्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंगी देवीच्या चैत्र महिन्यातील यात्रेसाठी खानदेशातील धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांसह कसमा भागातील लाखो भाविक परंपरेने दरवर्षी पायी चालत गडावर येतात.

चार ते आठ दिवसांचा प्रवास करीत हे भाविक पौर्णिमेच्या दिवसापर्यंत गडावर पोचण्यासाठी गडाकडे पदयात्रेने मार्गक्रमण करीत आहेत. गडाकडे येणारे सर्व बाजूंकडील रस्ते भाविकांच्या गर्दीने ओसंडून वाहत आहेत. हजारो भाविक गडावर दाखल झाले असून आज सुमारे एक लाख भाविकांनी सप्तश्रृंगीचे दर्शन घेतले.

आज चैत्र शु. त्रयोदशीची पंचामृत महापूजा विश्वस्त अॅड. ललित निकम यांनी सपत्निक केली. उद्या (ता.४) गडाच्या शिखरावर मध्यरात्री दरेगावचे गवळी पाटील पारंपरिक पद्धतीने कीर्तिध्वज फडकवतील. तत्पूर्वी दुपारी साडेतीनला जिल्हा सत्र न्यायाधीश तथा न्यासाचे अध्यक्ष वर्धन पी. देसाई व विश्‍वस्तांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात येईल.

त्यानंतर ध्वजाची सवाद्य मिरवणूक निघेल. उद्या महावीर जयंतीची सुट्टी व चैत्रोत्सवातील धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा दिवस असल्याने भाविकांची ऐतिहासिक गर्दी होण्याची शक्यता असल्यामुळे ट्रस्ट, ग्रामपंचायत, राज्य परिवहन महामंडळ, पोलिस यंत्रणा सज्ज आहे.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

the steps of the temple for the darshan of devotees.
Nashik News : जिल्ह्यातील 100 कलावंतांचे मानधन मंजूर

खानदेशातून लाखो भाविक दाखल

चावदसच्या पूर्वसंध्येस धुळे, जळगाव, साक्री, नंदुरबार, मालेगाव व नाशिक परिसरातून दीड लाखावर पदयात्रेकरू गडावर दाखल होत असल्याने गडावर आज रात्रीपासूनच मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

न्यासातर्फे भाविकांना मोफत महाप्रसादाची व्यवस्था केली असून, आज दिवसभरात २० हजारांवर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला असल्याची माहिती महाप्रसाद विभाग प्रमुख मुरलीधर गायकवाड यांनी दिली आहे.

गर्दीमुळे सटाणा ते नांदुरी व नाशिक ते वणी मार्गावरील वाहतूक धीम्यागतीने आहे. कळवण, सटाणा, मालेगाव या रस्त्यावर पायी चालणाऱ्या भाविकांसाठी विविध दानशूर व्यक्ती, सामाजिक मंडळे यांच्याकडून भक्तांसाठी पाणपोई, उसाचा रस, महाप्रसाद, भोजन व निवाऱ्याची सुविधा उपलब्ध करून देत भाविकांचे आदरातिथ्य राखले जात आहे.

८२ लाखांचा काढला विमा

आदिमायेच्या मंदिराच्या शिखरावर कीर्तीध्वज फडकविणारे मानकरी असलेले दरेगांव येथील गवळी पाटील कुटुंबातील १५ सदस्यांच्या सुरक्षतेची जबाबदारी स्वीकारुन शिखरावर कीर्तीध्वज नेणाऱ्या सदस्यांचा श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टतर्फे यावर्षी प्रथमच नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कंपनीचा ८२ लाख ५० हजार रुपयांचा स्वतंत्र विमा काढला आहे.

या निर्णयाचे दरेगावचे गवळी पाटील कुटुंबींयासह भाविकांनी स्वागत केले आहे. दरम्यान किर्तीध्वजाचे शेकडो वर्षांपासूनचे मानकरी हे दरेगावचे गवळी पाटील कुटुंबच असून कुठल्याही अफवेवर भाविकांनी विश्वास न ठेवण्याचे आवाहन ट्रस्ट, ग्रामपंचायत व गवळी पाटील कुटुंबीयांतर्फे भाविकांना केले आहे.

the steps of the temple for the darshan of devotees.
MPSC Pre-Training : ‘एमपीएससी’ पूर्व प्रशिक्षणासाठी सोमवारपर्यंत मुदत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.