Saptashrungi Devi : सप्तशृंगगडावर आशुतोष महादेव मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

saptashrungi Devi News
saptashrungi Devi Newsesakal
Updated on

वणी : आद्यस्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगगडावरील श्री भगवती मंदिरात ‘हर हर महादेव’, ‘सप्तशृंगी माते की जय’च्या जयघोषात व ओम नम: शिवायच्या मंत्रघोषात श्री आशुतोष महादेव मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आद्यस्वंयभू शक्तिपीठ श्री सप्तशृंगी मातेच्या मूर्तीचे सहा महिन्यांपूर्वी मूर्ती संवर्धनाचे कार्य विश्वस्त संस्थेने हाती घेतले होते. त्या वेळी आदिमायेच्या मूर्तीशेजारी असलेले श्री भगवान आशुतोष महादेव मूर्ती संवर्धन कार्यादरम्यान काढण्यात आली होती. आदिमायेच्या मूर्तीवरील पावनेदोन फूट जाडीचे शेंदुर कवच काढल्यानंतर मूळरुपातील मूर्ती समोर आली.

यानंतर नवमूर्तीचे श्री भगवती मंदिरात सहस्र कलश महास्नपन विधि, संप्रोक्षण विधी, उदक शांति, शांति होम इत्यादी धार्मिक पूजा विधी झाले होते. संपूर्ण १६०० देवी अथर्वशीर्ष पाठांचे अनुष्ठानही दरम्यानच्या कालावधीत झाले. मात्र आदिमायेच्या पूर्वीच्या मूर्ती जवळील श्री महादेवांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली नव्हती.

saptashrungi Devi News
Saptashrung Gad : श्री अन्नपूर्णा प्रसादालयातील स्वयंपाकगृह इपॉक्सी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून झाले अद्यावत!

दरम्यान, मंदिरातील श्री भगवान आशुतोष महादेव मूर्तीच्या दोनदिवसीय प्राणप्रतिष्ठा विधी सोहळा २५ व २६ जानेवारीला देवी सभामंडपातील यज्ञकुंड येथे झाला. संस्थानचे विश्वस्त डॉ. प्रशांत देवरे सहपत्निक तसेच महिला विश्वस्ता मनज्योत पाटील यांनी युवराज पाटील यांच्यासह केले.

पुरोहित्य आचार्य प्रमोद दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली मिलिंद राजेंद्र दीक्षित, मिलिंद दीक्षित, गौरव देशमुख, भाग्येश दीक्षित आदींनी केले. संस्थानचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, प्रकाश जोशी, मंदिरप्रमुख नारद अहिरे, सुनील कासार आदी उपस्थित होते.

saptashrungi Devi News
सह्याद्रीचा माथा : आदिमाया, आदिशक्ती, अष्टादशभुजा श्री सप्तश्रृंग निवासिनी...

''श्री भगवतीच्या मूर्ती संवर्धन कार्यादरम्यान श्री महादेव मूर्ती (पिंडी) काढण्यात आली होती. मूर्ती संवर्धनांनंतर मंदीरातील श्रीगणेश मूर्ती, श्री कालभैरवनाथ मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. मुहूर्तानूसार २५ व २६ जानेवारीस श्री महादेव मूर्तीचीही विधिवत प्राणप्रतिष्ठा विधिवत करण्यात आली आहे.'' - डॉ. प्रशांत देवरे, विश्वस्त, श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.