Saptashrungi Devi Gad : इर्शाळवाडीच्या घटनेने सप्तशृंगगडावर चिंतेचे वातावरण; धोकेदायक भागाबाबत नागरिक भयभीत

Saptashrungi Devi Gad Citizens are scared about  dangerous area near first step nashik news
Saptashrungi Devi Gad Citizens are scared about dangerous area near first step nashik newsesakal
Updated on

Saptashrungi Devi Gad : इर्शाळवाडी (ता. खालापूर) येथील दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सप्तशृंगगडावरील ग्रामस्थ व भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

श्री भगवती मंदिराच्या पायऱ्या परिसरात भूस्खलन झालेल्या धोकादायक भागात त्वरित उपाययोजना करणे गरजे आहे.

याबाबत सप्तशृंगगड ग्रामपंचायतीने आजच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पत्राबरोबरच 'सकाळ' ने याबाबतची छापलेली बातमी प्रशासनाला पाठवून कार्यवाही मागणी केली आहे. (Saptashrungi Devi Gad Citizens are scared about dangerous area near first step nashik news)

दरम्यान याबाबतच्या पाहणीत अतिवृष्टी झाल्यास भविष्यात लोकवस्तीजवळील डोंगराच्या पायथ्याचा भाग कोसळू शकतो अशी शक्यता वर्तवित उपाययोजना कराव्यात असे वनविभागाने म्हटले आहे.

समुद्र सपाटीपासून सुमारे १,४८० मीटर उंचीवर सप्तश्रृंगीगड (वणी) हे देशातील पहाडी भागात असलेल्या शक्तीपीठापैकी एक महत्त्वाचे आद्यस्वयंभू शक्तिपीठ आहे. वर्षभरात पन्नास ते साठ लाखांवर भाविक श्री भगवतीच्या दर्शनासाठी येत असतात. गडावर सुमारे चार हजार लोकसंख्येची नागरीवस्ती आहे.

स्वतंत्र ग्रामपंचायत आहे. दररोज पंधरा ते वीस हजार भाविकांची अस्थायी लोकसंख्या असते. गडावर देवीचे मंदिर डोंगराच्या कपारीत असल्याने पावसाळ्यात डोंगर कपारीतील धोकादायक दरडी कोसळण्याची शक्‍यता असते.

यापूर्वीही अशा स्वरूपाची दुर्घटना घडलेली असल्याने शासनाने भविष्यातील भीषण दुर्घटना टाळण्यासाठी दरडींना अटकाव करण्यासाठी लोखंडी संरक्षक जाळीचे कवच तसेच रॉक फॉल बॅरिअरचे काम केल्याने दरड कोसळण्याचा संभाव्य धोका काहीसा टळला असला तरी ही उपाययोजना पुरेशी होऊ शकत नाही अशी सध्याची स्थिती आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Saptashrungi Devi Gad Citizens are scared about  dangerous area near first step nashik news
Sant Nivruttinath Palakhi : वरुणराजाने केला निवृत्तिनाथांच्या पादुकांवर जलाभिषेक! वारकरी चिंब...

पहिल्या पायरीपर्यतच्या भागात धोका

आजमितीस श्री भगवती मंदिर परिसरातील पायऱ्यांवरील रामटप्पा, कासवटप्पा व रोपवे मार्गाच्या परिसरापासून पहिल्या पायरीपर्यंतच्या काही भागातील माती व दगड ढासळलेले आहेत. हा भाग हा ठिसूळ दगड, मुरुमयुक्तमातीचा असल्याने या भागातील माती पावसाळयात खाली वाहून येते.

खालच्या बाजूलाच लोकवस्ती व दुकाने, भक्तनिवास असल्याने या धोकादायक भागातून पावसाळ्यात मुरूम मातीचा भागाचे भूस्खलन होऊन दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. भाग हा वन विभागाच्या अखत्यारीत असल्याने सरपंच रमेश पवार यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपरिक्षेत्र कार्यालय कळवण यांना महिनाभरापूर्वी तसेच आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आदींना पत्र देवून कार्यवाहीची मागणी केली आहे.

आपत्कालीन परिस्थितीचे योग्य प्रकारे नियंत्रण तसेच आवश्यक ते मदतकार्य प्रक्रियेचे नियंत्रण तसेच पूर्ततेसाठी १४ जुलैला सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विशाल नरवडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ राजीव चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली गडावर झालेल्या बैठकीतही सरपंच रमेश पवार, ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके, तसेच ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी सदरच्या संभाव्य धोकादायक भागाचा मुद्दा उपस्थित केला.

Saptashrungi Devi Gad Citizens are scared about  dangerous area near first step nashik news
Saptashrungi Devi Temple : सप्तशृंगगडावर भाविकांसाठी ड्रेस कोड? लवकरच निर्णय होण्याचे सूतोवाच

वनपरिक्षेत्र अधिकारी दीपावली गायकवाड यांनी याबाबत कार्यवाही सुरु असल्याचे सांगत उपवनसंरक्षक पूर्व विभाग नाशिक यांना स्थळ पाहणी करून उपाययोजना सुचवून अंदाजपत्रके करण्याकामी विनंती केली असल्याचे सांगितले.

संभाव्य धोका आणि उपाययोजना

श्रीमती गायकवाड यांनी बैठकीनंतर राजीव चौबे, सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे व वनपाल, वनरक्षक यांच्यासमवेत धोकादायक भागाची पाहणी केली होती. पहाणीदरम्यान राखीव वनकक्ष २९९ मध्ये आई भगवती मंदिर व आजूबाजूच्या परिसरात काही ठिकाणी डोंगरावरील माती व दगड ढासळलेले दिसून आली होती.

त्या अनुषंगाने श्रीमती गायकवाड यांनी तत्काळ उप वनसंरक्षक पूर्व विभाग नाशिक यांना पत्र पाठवून मंदिर परिसरातील भूस्खलन झालेल्या डोगराच्या पायथ्याशी वस्ती असल्याने भविष्यात जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता असल्याचे नमूद करून भुस्खलनामुळे खाली वाहून येणारे माती व दगड यांना अटकाव करण्यासाठी तात्पुरती उपाययोजना म्हणून संरक्षक भिंत, दगडी भिंत (गॅबियन स्ट्रक्चर) बांधणे तत्काळ आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

Saptashrungi Devi Gad Citizens are scared about  dangerous area near first step nashik news
Saptashrungi Devi Gad : सप्तशृंग गडावरील संभाव्य धोका टळावा; मंदिर ट्रस्ट, ग्रामपंचायतीचे प्रशासनाला पत्र

"मंदिराजवळील संभाव्य धोकादायक भागाची पाहणी केली. या भागाची भूशास्त्रीय तज्ज्ञांकडून परीक्षण केल्यानंतर उपाययोजना करणे गरजेचे आहे. सद्यःस्थितीत तेथे धुके, पाऊस सुरु असल्याने तेथे कोणतेही काम करणे जोखमीचे आहे. असे असले तरी प्राथमिक उपाय म्हणून धोकादायक ठिकाणी संभाव्य जीवित व वित्तीयहानी टाळण्यासाठी सुरक्षितस्थळी व सतर्क राहाणे आवश्यक आहे."- राजीव चौबे, आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ

"श्री भगवती मंदिराजवळील काही ठिकाणी डोंगरावरील माती व दगड ढासळलेले आहेत. तात्पुरती उपाययोजना म्हणून दगडी भिंत (गॅबियन स्ट्रक्चर) तत्काळ बांधणे आवश्यक असल्याबाबत तसेच कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून भूविज्ञान तज्ञांकडून सर्वेक्षण व्हावे यासाठी वरिष्ठ कार्यालयास विनंती पत्रासह अहवाल सादर केला आहे." - दीपावली गायकवाड, वनपरिक्षेत्र अधिकारी, कळवण.

"गडावरील मंदिर परीसरातील भुस्खलनास प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत ग्रामपंचायतीने प्रशासनास वेळोवेळी पत्रव्यवहार व तोंडी तक्रारी केल्या आहेत. इर्शाळवाडीच्या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे."- संदीप बेनके, ग्रामपंचायत सदस्य.

Saptashrungi Devi Gad Citizens are scared about  dangerous area near first step nashik news
Saptashrungi Devi Gad : सप्तशृंगगडावर दीपपूजन; दिवे बंद केल्यानंतर उजळले देवीचे तेजोमय रूप!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.