Saptashrungi Devi : भगवती कीर्तिध्वजाला विमा संरक्षणाची किनार! यंदा गडावर 9 लाख भाविक अपेक्षित

saptashrungi Devi News
saptashrungi Devi Newsesakal
Updated on

नाशिक : खानदेशचे आराध्य दैवत आद्यपीठ श्री सप्तशृंग निवासिनी देवीच्या चैत्रोत्सवासाठी शनिवारी (ता. १) रात्रीपासून भाविक दाखल होण्यास सुरवात झालेल्या भाविकांची गर्दी पाहता, यंदा उत्सवाच्या काळात किमान नऊ लाख भाविकांची हजेरी लागण्याचा अंदाज आहे.

चैत्रोत्सवात फडकणाऱ्या भगवतीच्या कीर्तिध्वजाच्या परंपरेला शाश्‍वता यावी म्हणून विम्याच्या संरक्षणाची किनार करण्यात आली. (Saptashrungi Devi Insurance cover for Bhagwati Kirtidhvaja This year 9 lakh devotees expected nashik news)

दरेगावच्या गवळी कुटुंबाकडे वंश परंपरागत कीर्तिध्वजाची परंपरा राहिली आहे. या परिवाराशी निगडित पंधरा जणांना प्रत्येकी दहा लाख रुपयांच्या विम्याचे कवच देण्यात आले आहे. कीर्तिध्वजाचे मंगळवारी (ता. ४) गडावर पूजन होईल. त्यानंतर मिरवणूक काढण्यात येईल.

या परंपरागत उत्सवाला विम्याच्या शाश्‍वतीची किनार देण्यात आल्याचे विश्‍वस्त मंडळातर्फे सांगण्यात आले. २०१४-१५ पासून गडावर येणाऱ्या भाविकांसाठी जनसुरक्षा विम्याचे कवच देण्यात येते. सहा कोटी रुपयांच्या विमा संरक्षणाचा प्रीमियम विश्‍वस्त मंडळातर्फे देण्यात येतो.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

saptashrungi Devi News
SAKAL Exclusive : लोकवर्गणीतून खो-खो प्रबोधिनीने घडविल्या 35 ‘सुवर्णकन्या’!

शनिवारपासून गडावर दाखल होण्यास सुरवात झालेले भाविक आज, सोमवारी (ता. ३) गडावर मुक्कामी थांबतील. पालखी सोहळा सुरू झाल्यावर हे भाविक परतण्यास सुरवात होईल.

भगवती सप्तशृंग देवीची ओळख

सप्तानां महादादीनां प्रकृतीनां यतः शिरः । श्रेष्ठा प्रकृतिरुपेण सप्तशृंगी चोच्यते ॥

सात महत् ( भु भुवः स्वः महः जनः तपः आदी स्वर्गावर) शिरोभागावर जी प्रकृती रूपाने विराजमान आहे, तीच भगवती ‘सप्तशृंग’ या नावाने जगात ओळखली जाते.

saptashrungi Devi News
Dhule News : तब्बल 58 कोटी रुपये येणे बाकीच! मालमत्ता कर वसुलीची स्थिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.