Navratri 2022 : देवीचा पालखी सोहळा अन् नगरप्रदक्षिणा; गडावर फडकणार कीर्तिध्वज

Palkhi procession taken out on Monday on the occasion of Durgashtami.
Palkhi procession taken out on Monday on the occasion of Durgashtami.esakal
Updated on

वणी (जि. नाशिक) : आद्य स्वयंभू शक्तिपीठ सप्तशृंगगडावर सोमवारी (ता. ३) दुर्गाष्टमीनिमित्त देवीच्या सुवर्ण अलंकाराची विश्वस्त संस्थेच्या मुख्य कार्यालयातून शेकडोंच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली. अष्टमीचा नियोजित असलेला पालखी सोहळा अर्थात, श्री भगवती पालखीचे विधिवत पूजन देणगीदार भाविक अॅड. अखिलेश नाईक व कुटुंबीयांनी करून नगरप्रदक्षिणा करण्यात आली.

दरम्यान, सोमवारी आदिमायाच्या दरबारात सुमारे तीस हजार भाविकांनी हजेरी लावली. महानवमीनिमित्त मंगळवारी (ता.४) मध्यरात्री गडाच्या शिखरावर दरेगावचे गवळी पाटील कीर्तिध्वज फडकवतील. (Saptashrungi Devi palanquin ceremony Nagar Pradakshina flag of glory hoisted on fort Nashik Latest Marathi News)

सप्तशृंगीदेवीच्या पंचामृत महापूजेदरम्यान भारत सरकारच्या ‘कॅट’चे अध्यक्ष तथा उच्च न्यायालयाचें न्यायमूर्ती रणजित मोरे व उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ व कुटुंबीय.
सप्तशृंगीदेवीच्या पंचामृत महापूजेदरम्यान भारत सरकारच्या ‘कॅट’चे अध्यक्ष तथा उच्च न्यायालयाचें न्यायमूर्ती रणजित मोरे व उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ व कुटुंबीय.esakal

आठवे रूप महागौरीचे

नवरात्रोत्सवातील सोमवारची आठवी माळ होती. देवीचे आठवे रूप महागौरीची पूजा केली जाते. महागौरीने श्वेत रंगाचे वस्त्र आणि दागिने परिधान केले आहेत. तिला चार हात आहेत आणि बैल तिचे वाहन आहे. महागौरी हे देवी पार्वतीचेच एक रूप आहे. पौराणिक कथेनुसार, पार्वतीने भगवान महादेवांची कठोर तपस्या केल्यानंतर त्यांना पती म्हणून प्राप्त केले होते. महागौरीच्या उपासनेने साधकाला धन, वैभव, सुख-समृद्धी प्राप्त होते. महागौरीला प्रसन्न करण्यासाठी ‘सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्रयंबके गौरी नारायणी नमोस्तुते’ या मंत्राचा जप केला जातो.

सोमवारी सकाळी नऊला दुर्गाष्टमीनिमित्त देवीच्या सुवर्ण अलंकाराची विश्वस्त संस्थेच्या मुख्य कार्यालयातून शेकडोंच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली. श्री सप्तशृंगीदेवीची पंचामृत महापूजा ‘कॅट’चे अध्यक्ष तथा उच्च न्यायालयाचें न्यायमूर्ती रणजित मोरे व उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ यांनी सपत्नीक केली.

Palkhi procession taken out on Monday on the occasion of Durgashtami.
Dasara 2022 : दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर फुलबाजार तेजीत; झेंडू शंभरी गाठणार!
न्यासाच्या कार्यालयात स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्राचे प्रमुख अण्णासाहेब मोरे, न्यायमूर्ती रणजित मोरे यांचे स्वागत करताना तहसीलदार बंडू कापसे, व्यवस्थापक दहातोंडे.
न्यासाच्या कार्यालयात स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्राचे प्रमुख अण्णासाहेब मोरे, न्यायमूर्ती रणजित मोरे यांचे स्वागत करताना तहसीलदार बंडू कापसे, व्यवस्थापक दहातोंडे. esakal

श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक व बालसंस्कार केंद्राचे प्रणेते अण्णासाहेब मोरे व राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी महानैवेद्य आरती केली. श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंगगडचे विश्वरत तथा कळवणचे तहसीलदार बंडू कापसे, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील व जिल्हा न्यायालयाचे राजशिष्टाचार अधिकारी नितीन आरोटे, विश्वस्त संस्थेचे व्यवस्थापन व प्रशासन प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

नगरप्रदक्षिणेत हजारो भाविक सहभागी झाले होते. उद्या (ता. ४) समुद्रसपाटीपासून चार हजार ५६९ फूट उंचीवर असलेल्या सप्तशृंगगडाच्या शिखरावर मध्यरात्री कीर्तिध्वजाचे मानकरी दरेगावचे गवळी पाटील पांरपरिक पद्धतीने कीर्तिध्वज फडकवणार आहेत. तत्पूर्वी न्यासाच्या विश्‍वस्तांच्या हस्ते दुपारी चारला ध्वजपूजन होऊन मानकरी गवळी पाटील यांच्याकडे ११ मीटरचा केशरी ध्वज, दहा फूट लांबीची काठी, २० ते २५ किलो वजनाचे पूजेचे साहित्य सुपूर्द करणार आहेत. त्यानंतर ध्वजाची सवाद्य मिरवणूक निघेल.

Palkhi procession taken out on Monday on the occasion of Durgashtami.
Durga Puja Utsav 2022 : गांधीनगरला दुर्गापूजा उत्सवाला सुरवात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.