सुरक्षारक्षकाच्या खुनाचा उलगडा; प्रेमात अडथळा ठरत असल्याने केला खुन

murder of security personnel latest crime news
murder of security personnel latest crime news sakal
Updated on

वणी /कळवण (जि. नाशिक) : श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावरील श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट येथे सुरक्षारक्षक पदावर कार्यरत असलेल्या अर्जुन अंबादास पवार याच्या खुनाचा उलगडा पोलिसांनी केला असून प्रेमात अडसर ठरणाऱ्या प्रियशीच्या पतीलाच खून करुन संपविल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी संशयितास गजाआड करत त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.(saptashrungi trust Security Guard Murder case Killed by boyfriend of his wife nashik Latest Marathi News)

कळवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्तशृंगी गड येथील रहिवाशी अर्जुन अंबादास पवार, वय ३० रा. काही वर्षापासून सासुरवाडी भेंडी, ता. कळवण येथे राहत होता. सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट येथे तो सुरक्षारक्षक पदावर कार्यरत होता.

डयुटीसाठी तो भेंडी ते सप्तशृंगीगडावर दुचाकीवरून ये- जा करत असे. मंगळवारी, ता. १२ जुलै रोजू सप्तशृंगीगडावर रात्री साडे आठच्या वाजेचा सुमारास ड्यूटीवर जात असताना संशयित आरोपी रामदास पवार याने गडावरील धुके आणि पावसाची संधी साधून रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास गडावरील धबधब्याजवळ अर्जुन पवार याच्यावर कुन्हाडीने वार केले.

दरम्यान, सप्तशृंगीगडावर दर्शनाला येणाऱ्या भाविक भक्तांनी पोलीस स्थानकात घाटात जखमी अवस्थेत पडलेल्या युवकाबद्दल माहिती दिली. मात्र, वैद्यकिय उपचार मिळण्यापूर्वीच अर्जुन पवार याचा मृत्यू झाला होता. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात मानेवर व चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे मृत्यु झाल्याचे निष्पन्न झाले होते.

murder of security personnel latest crime news
काझीगढी रहिवाशांचा मनपा कर्मचाऱ्यांवर रोष; भिंतीचा भाग कोसळला

दरम्यान कळवण पोलीस निरीक्षक समाधान नागरे व त्यांच्या पथकाने गुन्ह्याचा तपास सुरू केला. तपासात धागेदोरे हाती लागल्यानंतर पोलिसांनी संशयित रामदास पवार याच्या मुसक्या आवळल्या.

रामदास पवार याने मयत अर्जुनच्या पत्नीशी प्रेमसंबंध असल्यामुळे व प्रेमात अडथळा आल्याने खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. पोलिसांनी संशयितास ताब्यात घेऊन कळवण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान संशीयीतास कळवण न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

murder of security personnel latest crime news
सुधारित GSTची आजपासून अंमलबजावणी; नाशिकमध्ये वेबिनार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()