सराफा व्यावसायिकाला लुटले : नोकरावर चाकू हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू

मालेगाव घटनेचा निषेध करीत रिसोड सराफा बाजार बंद
Sarafa trader robbed servant attack treatment during death
Sarafa trader robbed servant attack treatment during deathSAKAL
Updated on

मालेगाव : अंजनकर ज्वेलर्सचे मालक व त्यांचा नोकर हे नेहमीप्रमाणे आपले सोन्या-चांदीचे दुकान बंद करून, देशपांडे प्लॉटच्या बाजूला असलेल्या घरी मोटारसायकलने जात असताना दबा धरून बसलेल्या दोन चोरट्यांनी हवेत गोळीबार करून अंजनकर व त्यांचा नोकर यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून ,चाकू हल्ला केला व पैशाची बॅग घेऊन पसार झाले. चोरट्यांनी केलेल्या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नोकराचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. सदर घटनेमुळे सराफा व्यावसायिकात भितीचे वातावरण पसरले आहे. यामध्ये योगेश अंजनकर जखमी झाले आहेत.

Sarafa trader robbed servant attack treatment during death
पर्यावरण जैवविविधता व संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी गोवा सायकलिंग अभियानाला सुरुवात. चाळीस विद्यार्थी सहभागी

गोळीबाराचा आवाज ऐकून शेजारी घराबाहेर आले. चोरटे मोटरसायकलवरुन पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतांना त्यांची मोटरसायकल स्लिप झाली. मोटरसायकल तिथे सोडून, चोरटे साथीदाराच्या मोटरसायकलवर पैशाची बॅग घेऊन पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या नोकराला वाशीम येथे उपचारासाठी नेले असता नोकराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. योगेश अंजनकर यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेने शहरात सराफा व्यवसायिकात घबराट पसरली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच ठाणेदार प्रवीण धुमाळ यांनी ताबडतोब वाशीम येथील पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून तपास सुरू केला आहे. पोलिस अधीक्षक, तसेच इतर पोलिस अधिकारी गुन्हेगारांचा कसुन तपास करीत आहेत. तपास योग्य दिशेने सुरू असून, चोरटे लवकरच हाती लागतील. सराफा व्यावसायिकांनी धीर धरण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. वाशीम जिल्ह्यातील सर्व सराफा व्यावसायिकांनी मालेगाव येथे येऊन नोकर रवी वाळेकर यांना श्रद्धांजली वाहिली व पोलिस प्रशासनाला चोरट्यांना लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी केली आहे.

Sarafa trader robbed servant attack treatment during death
मुख्यमंत्री नसल्याने काय फरक पडणार : रावसाहेब दानवे

मालेगाव घटनेचा निषेध करीत रिसोड सराफा बाजार बंद

मालेगाव शहरातील अंजनकर ज्वेलर्चे मालक योगेश अंजनकर व रविंद्र वाडेकर यांचेवर पाच ते सहा लोकांनी हल्ला करून वाडेकर यांची निर्घृण हत्या केल्याच्या निषेधार्थ रिसोड येथील सोने व्यापारी असोसिएशन यांनी आज दिनांक २२ डिसेंबर रोजी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला. सोने व्यापारी असोसिएशनच्या वतीने पोलिस स्टेशन रिसोड व तहसील कार्यालय येथे निवेदन देऊन संबंधित मारेकऱ्यांना त्वरित अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. याप्रसंगी अजय बगडिया, हर्षल काटोले, काशिनाथ अडाणे, मनीष बगडिया, दिनकर गोटे व असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.