येवला : काय तो रुबाब, काय ती चाल, काय तो ऐटबाजपणा, काय तो देखणेपणा..असं रसभरीत वर्णनही पिके पडेल असे डोळे दिपवणाऱ्या सौंदर्याने येथील देखणी ‘अश्वराणी’ घोडीने सर्वांनाच मोहिनी घातली...याचमुळे सारंगखेडा येथील चेतक फेस्टिवल मध्ये ३०० पेक्षा अधिक घोड्यातून येवल्याच्या अश्वराणीने सौंदर्यात प्रथम क्रमांकाने बाजी मारली.
हौसेला मोल नसते.. म्हणूनच कितीही लाख किंमत असली तरी देखण्या ऐटबाज अन ताकदवान घोडे खरेदी करणाऱ्यांची आणि सांभाळणाऱ्याची संख्या देशभरात कमी नाही, याचा प्रत्यय सारंगखेड्यातील चेतक फेस्टिवलमध्ये आला. किंबहुना देखणेपणाची होणारी अश्वसौंदर्य स्पर्धा ही भारतातील अश्व शोकीनांसाठी मोठी पर्वणी ठरली. सारंगखेडा येथे १८ व्या शतकापासून दरवर्षी भरणाऱ्या घोड्यांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे. यानिमित्ताने येथे चेतक फेस्टिवलमध्ये होणारी अश्व सौंदर्य स्पर्धा प्रसिद्ध असून येवल्यासाठी ही राष्ट्रीय स्पर्धा आता पर्वणीच ठरली आहे.
या अश्व सौंदर्य स्पर्धेत घोड्याची चाल, त्याची शरीराची ठेवण, उंची रुबाबदारपणा यासह त्यातील सर्वच गुणांचे मूल्यमापन करून चेतक फेस्टिवलमध्ये सर्वात सुंदर घोडा आणि घोडीची निवड करण्यात आली. विविध गटात राज्यस्थान येथील अश्वांनी बाजी मारली असली तरी मारवाड गटात मात्र येवल्याच्या ‘अश्वराणी’ भाव खाऊन गेली. या गटात तिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
हेही वाचा: Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?
यावर्षीचा या गटातील अश्व सुंदरीचा पहिल्या नंबरचा बहुमान शहरातील अशवप्रेमी सम्राट जाधव याच्या अश्वराणी या ३२ महिने वयाच्या मादी अश्वाला मिळाला. या घोडीची आई ‘कोयल’ ही पंजाबचे प्रसिद्ध राजकीय नेते सुखबिर सिंग बादल यांच्या बादल स्टड फार्म मधील असून घोडीचा पिता ‘देवराज’ हा पंजाब मधील रणाया येथील आहे. विशेष म्हणजे मागेल त्या किंमतीत अश्वराणीला खरेदीदारांनी आपला रस दाखवला. स्पर्धेत विजय मिळविल्याने आयोजकांनी अश्वराणीला चषक व सजावटीचे साहित्य देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेसाठी देशभरातून अश्व मालक आपले घोडे घेऊन आले होते. स्पर्धेत प्रथम द्वितीय, तृतीय आलेल्या घोड्यांवर मोठ्या बोली लावली. देशाच्या कानाकोपऱ्यातून या आश्व सौंदर्य स्पर्धा पाहण्यासाठी लोक आले होते. देशात पहिल्यांदाच सारंगखेडा येथे डे नाईट स्पर्धा होत असल्यानं अश्व प्रेमींसाठी ही मोठी उत्साहाची बाब ठरली होती. सारंगखेड्यातील घोडेबाजारामध्ये दाखल झालेले महागड्या घोड्यांची विक्री हे त्यांचे मालक करत नसतात.
तर केवळ अश्व प्रदर्शनासाठी हे घोडे सारंगखेडा येथे दाखल होत असतात. या घोड्यांच्या ब्लड लाइन आणि इतर गोष्टींमुळे ते अश्व प्रजनन साठी वापरले जातात. त्यातून या घोड्या मालकांना कोट्यावधी रुपयांचा फायदा होत असल्याचे सांगितले जाते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.