Nashik News : बांधकामात हलक्या प्रतीचे पाइप वापरल्याने सरपंचाने बंद पाडले जल जीवन मिशनचे काम

The work of Jaljivan Mission at Ganga Padli has been stopped by the villagers.
The work of Jaljivan Mission at Ganga Padli has been stopped by the villagers.esakal
Updated on

Nashik News : गंगा पाडळी लाखलगाव (ता. नाशिक) या ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच आत्माराम दाते यांनी जलजीवन मिशन अंतर्गत भुयारी पाइपलाइन योजनेचे काम गुणवत्ता नियंत्रण नाही म्हणून बंद पाडले असून या संदर्भात जिल्हा परिषद अधिकारी व ठेकेदारांची तक्रार करणार असल्याचे दाते यांनी सांगितले.

The work of Jaljivan Mission at Ganga Padli has been stopped by the villagers.
Nashik News : सोयीच्या जबाबासाठी पोलिसांकडून दबाव; जमिनीच्या वादात त्रस्त दिव्यांग तक्रारदाराची व्यथा

गंगा पाडळी व लाखलगाव ही ग्रुप ग्रामपंचायत आहे. सध्या गावांमध्ये जमिनीतून पाण्याची कनेक्टिव्हिटी निर्माण व्हावी म्हणून पाइप टाकण्याचे काम चालले आहे. मात्र हे पाइप हलक्या प्रतीचे असून ऑर्डरमध्ये दिल्याप्रमाणे विशिष्ट जाडीचे पाइप नाही म्हणून ग्रामस्थांसह सरपंच आत्माराम दाते यांनी सदरील काम बंद पाडले आहे.

हा प्रकल्प ९८ लाखांचा असून ठेकेदार यातून मलिदा खात असून सर्व साहित्य तकलादू वापरत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. गिरणार याला चार महिन्यापूर्वी असेच काम ठेकेदाराने केले होते मात्र त्याचा बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे. यासंबंधी काही ग्रामपंचायत सदस्यांसह सरपंच मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांना निवेदन देणार आहेत.

पी ६३ या वजनदार गुणवत्तेचे पाइप ऐवजी पी १०० या तिसऱ्या कॅटेगिरीचे पाइप वापरण्यात आले आहे. या कामात गुणवत्तेचा विचार केलेला नाही. ९८ लाखाचा निधीचा चुराडा होत आहे. त्यामुळे होणारा खर्च वाया जाण्याची शक्यता असल्यामुळे काम बंद पाडले आहे. शासनाच्या ऑर्डर प्रमाणे मंजूर केलेले पाइप जलजीवन मिशन कामात वापरावे. या संदर्भात जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटणार आहोत. - आत्माराम दाते, सरपंच, गंगा पाडळी

The work of Jaljivan Mission at Ganga Padli has been stopped by the villagers.
Dhule News : मराठी विषयाचे मूल्यमापन आता ‘श्रेणी’ स्वरूपात! मविआ’चा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने फिरविला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.