Nashik News: 3 महिन्याच्या बाळासह सरपंच महिलेचे उपोषण सुरू! कारवाईबाबत प्रशासनाची चालढकल

Mangalne Sarpanch Vaishali Pawar with her three-month-old baby sitting on an indefinite hunger strike outside the Panchayat Samiti.
Mangalne Sarpanch Vaishali Pawar with her three-month-old baby sitting on an indefinite hunger strike outside the Panchayat Samiti.esakal
Updated on

नांदगाव : मंगळणे येथील ग्रामसेविकेच्या विरोधात महिला सरपंच वैशाली पवार यांनी येथील तालुका पंचायत समिती बाहेर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

आज उपोषणाच्या तिसऱ्या दिवशीही कुठलाच तोडगा निघालेला नव्हता. उपोषणार्थी महिला सरपंच वैशाली या आपल्या तीन महिन्यांच्या तान्हुल्यासोबत ठाण मांडून बसलेल्या असून प्रशासनाने दखल घेतलेली नाही.

यंत्रणेला या प्रकरणात एवढे स्वारस्य कशासाठी असा सवाल लोकशाही धडक मोर्चाचे नेते शेखर पगार यांनी प्रभारी गटविकास अधिकारी दळवी यांना विचारला आहे. (Sarpanch woman with 3 month old baby on hunger strike Conduct of administration regarding action Nashik News)

ज्या ग्रामसेविकेविरोधात हे उपोषण सुरु आहे, त्यांच्याकडे मंगळणे येथील ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कारभार आहे. प्रभारी पदभार काढून घेता येऊ शकतो असे सांगून पगार यांनी उद्या या प्रश्नावर रास्तारोको करण्याचा इशारा आज दिला.

विस्तार अधिकारी विजयकुमार ढवळे यांनी मंगळणे गावाला भेट देत ग्रामस्थांचे अतिक्रमण व अन्य मुद्द्यांवर जबाब नोंदवून आपला अहवाल प्रभारी गटविकास अधिकारी दळवी यांच्याकडे सायंकाळी सुपूर्द केला.

ग्रामसेविका ए. पी. आहेर या कर्तव्यावर आल्यापासूनच सतत कसूर करत आल्या आहेत. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून ग्रामपंचायत कार्यालयात आलेल्या देखील नाहीत. त्यांनी सात ते आठ महिन्यांपासून मासिक बैठका देखील घेतलेल्या नाही.

Mangalne Sarpanch Vaishali Pawar with her three-month-old baby sitting on an indefinite hunger strike outside the Panchayat Samiti.
Nashik News: सिन्नर बाजार समितीचे सभापती पवारांचे संचालक पद रद्द!

२८/०२/२०२३ ला दमबाजी करून व निलंबनाच्या धमक्या देऊन मासिक प्रोसिडिंग बुकवर पुढील चार ते पाच महिन्यांच्या आगाऊ सह्या करून घेतल्या आहेत.

ग्रामसेविका स्वतः अनुपस्थित राहून व कर्तव्यात कसूर करून देखील याबाबत विचारणा केली असता उलट मला सरपंचाला व इतर सदस्यांना नेहमी खोट्या प्रकरणात अडकवून कारवाई करण्याची व निलंबन करण्याच्या धमक्या देतात असा आरोप मंगळणेच्या सरपंच वैशाली पवार यांनी केला. जोवर कारवाई होत नाही तोवर उपोषणातून माघार घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

Mangalne Sarpanch Vaishali Pawar with her three-month-old baby sitting on an indefinite hunger strike outside the Panchayat Samiti.
Nashik: सिन्नरमध्ये डेंगूसदृश्य रुग्णांच्या संख्येत वाढ! नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागातर्फे धूर फवारणीसह सर्व्हेक्षण सुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.