Balnatya Saprdha : सावाना बालनाट्य स्पर्धेची तिसरी घंटा वाजली! जिल्ह्यातील 14 शालेय, नाट्यसंस्थांचा सहभाग
नाशिक : येथील सार्वजनिक वाचनालय बालभवन साने गुरुजी कथामालेतर्फे (कै.) रत्नाकर गुजराथी बालनाट्य स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी (ता. २०) सावानाचे विद्यमान अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांच्या हस्ते झाले.
कै. रत्नाकर गुजराथी हे वाचनालयाचे जुने पदाधिकारी होते. त्यांनीच हे बालनाट्य स्पर्धेचं रोपटे लावलेले आणि वाढविलेले आहे, असे प्रतिपादन प्रा. फडके यांनी याप्रसंगी केले. (sarvajanik vachnalaya Balnatya Saprdha started Participation of 14 school and theater institutions in district nashik news)
या वेळी बालभवन प्रमुख प्रा. सोमनाथ मुठाळ, कार्याध्यक्ष गिरीश नातू, नाट्यगृह सचिव सुरेश गायधनी, ग्रंथ सचिव जयप्रकाश जातेगावकर, अर्थ सचिव देवदत्त जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. २० ते २२ जानेवारी दरम्यान शहरातील परशुराम साईखेडकर नाट्यगृहात होणार आहे. स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण १४ शालेय तसेच नाट्यसंस्थांनी सहभाग नोंदविला आहे.
सुभाष पाटील, श्रीराम वाघमारे, पल्लवी ओढेकर हे या बालनाट्य स्पर्धेचे परिक्षण करणार आहेत. प्रा. मुठाळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तर गीतांजली नाईक यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान, स्पर्धेच्या पहिल्या (ता. २०) दिवशी, मोहिनीदेवी रुंगठा प्राथमिक विद्यामंदिरतर्फे ‘गृहपाठाला सुट्टी’ तर पुष्पावती रुंगठा हायस्कूलतर्फे ‘आणि.. शाळा सुरू झाली’ ही दोन बालनाट्ये सादर झाली.
शनिवारी (ता. २१) स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० ते ४ वाजेदरम्यान बालनाट्यांचे सादरीकरण होईल. यात वाय. डी बिटको गर्ल्स हायस्कूलतर्फे ‘तुला इंग्रजी येते का?’, मनपा शाळा क्रमांक १८ तर्फे ‘पिढीजात’, संजीवनी प्राथमिक विद्यामंदीर सिन्नरतर्फे ‘आम्हाला पण शाळा पाहिजे, म. गां. हायस्कूल इगतपुरीतर्फे ‘मिशन मास्तर’, रचना विद्यालयातर्फे ‘रिले’, समिज्ञा बहुउद्देशीय संस्था नाशिकतर्फे ‘बदला’ ही बालनाट्ये सादर होणार आहे.
तर रविवारी (ता. २२) स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी सकाळी ८.३० ते ४ वाजेदरम्यान, श्रीमती रंगूबाई जुन्नरे स्कूलतर्फे ‘शोध स्वतःचा ते ज्ञान’, दीपक मंडळ सांस्कृतिक विभागतर्फे ‘माझे गीता रहस्य’, इस्पॅलियर स्कूलतर्फे ‘अद्भुत बाग’, रवींद्रनाथ टागोर स्कूलतर्फे ‘हॅम्लेट... एक शोकांतिका’, रवींद्र मंडळ प्राथमिक शाळेतर्फे खरंच मोबाईल आहे का इतका गरजेचा?’, र. ज. चव्हाण गर्ल्स हायस्कूलतर्फे ‘दुधावरची साय’ ही बालनाट्ये सादर होणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.