नाशिकमधील कामगिरीवर भरपूर समाधानी : दीपक पांडे

Deepak Pandey
Deepak Pandeyesakal
Updated on

नाशिक : नाशिक शहर पोलिस आयुक्त म्हणून सतरा महिने मिळालेल्या कालावधीत केलेले काम आणि निर्णयावर मी प्रचंड समाधानी असून या काळात अनेक चांगले निर्णय घेतले असल्याचे मत नाशिक शहर पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी केले. नाशिक पोलिस आयुक्त दीपक पांडे यांची मुंबईत राज्याच्या महिला अत्याचार प्रतिबंधक विभागाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. गुरुवारी (ता.२२) पोलिस आयुक्तालयात त्यांनी आपल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा निरोप घेत कामगिरीवर समाधानी असल्याचे सांगत पुढील आयुक्तांना देखील माझ्याप्रमाणेच मदत करण्याचे आवाहन देखील केले.

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी असे उपक्रम राबविले...

नाशिक पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर दीपक पांडे यांनी शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अनेक चांगले उपक्रम राबविले. यात कोरोनामध्ये त्यांनी अधिकारी व कर्मचारी यांचे स्वास्थ जपत त्यांचे मनोबल उंचावले. त्यानंतर आंनदवल्ली येथे शेतकऱ्याचा झालेला खुनाचा छडा लावला. यात मोठ्या प्रमाणात भूमाफिया सहभागी असल्याने त्यांनी प्रथम भूमाफिया यांच्यावर मोक्कातंर्गत कारवाई केली. राज्यात भूमाफियावर पहिल्यांदाच अशी कारवाई झाली. त्यानंतर शहरातील भाईगिरी मोडीत काढण्यासाठी अनेक संघटित टोळ्यांवर मोक्याची कारवाई केली. बेशिस्त वाहनचालक यांच्यावर लगाम बसावा म्हणून हेल्मेटसक्ती, नो हेल्मेट नो पेट्रोल असे उपक्रम राबविले.

Deepak Pandey
देशात यंदा ३ हजार १६० लाख टन अन्नधान्य उत्पादनाचा अंदाज

भविष्यात राज्य व केंद्र नक्कीच आपला नियम बदलतील

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यावर नाशिक शहरात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी यावर देखील ठोस कारवाई केली. त्यामुळे ते राज्यभर चांगलेच चर्चेत आले. त्यानंतर त्यांनी महसूल अधिकाऱ्यांना अधिकारावरून लेटर बॉम्ब टाकला. यावरुन त्यांच्यावर टिकेची झोड देखील उठविली. यानंतर भोंगे बाबत देखील त्यांनी आपली रोखठोक भूमिका मांडल्यानंतर त्याची दखल राज्य सरकारने देखील घेतली. भोंगेबाबत आणि महसूल नियमासंदर्भात केलेल्या पत्रव्यवहारासंदर्भात आपण आजही ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात यावर राज्य व केंद्र नक्कीच आपला नियम बदलतील, अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली.

Deepak Pandey
Water Crisis | 18 टँकरने 15 गावांची भागतेय तहान!

आपल्या कामगिरीवर खूप समाधानी...

आपल्या नाशिकमध्ये सेवा करण्याची संधी मिळाल्यानंतर आपल्या आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिल्याचे सांगत त्यांनी आपण आपल्या कामगिरीवर खूप समाधानी असल्याचे सांगत आता महिला अत्याचार प्रतिबंधक विभागाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. तिथे देखील आपण चांगलेच काम करणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.