Nashik Crime News: परप्रांतीय गुन्हेगारांसाठी सातपूर- अंबड ठरतंय आश्रयस्थान! पोलिसांकडून Moniteringची आवश्‍यकता

crime news
crime newsesakal
Updated on

नाशिक : सातपूरमधून २०१० मध्ये दहशतवादी बिलाल शेख यास मुंबईच्या एटीएसच्या पथकाने अटक केल्यानंतर मोठा कट उघडकीस आला होता. बिलालने नाशिक शहरातील रेकी करून त्याची माहिती कुख्यात दहशतवादी अबू जिंदाल यास पुरविली होती.

तेव्हापासून सातपूर, अंबडचा औद्योगिक वसाहतीलगतचा परिसर हा परप्रांतीय गुन्हेगारांसाठी आश्रय बनल्याचे वारंवार समोर येत आहे. याच परिसरातून कुख्यात गुन्हेगारांचे वास्तव्य राहिल्याचे अनेक गुन्ह्यांच्या तपासातून स्पष्टही झाले आहे.

असे असतानाही पोलिसांकडून अद्यापही अंबड- सातपूर परिसरात रहिवासाला आलेल्या परप्रांतीयांबाबत कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. परिणामी, खून, हाणामाऱ्या, दहशत माजविण्याचे प्रकार सातत्याने घडतच राहण्याची शक्यता असून, त्यामुळे शहराच्या शांततेवर विपरीत परिणाम होतो आहे. (Satpur Ambad becoming den for foreign criminals Need for monitoring by city police Nashik News)

मुंबई- पुणे पाठोपाठ नाशिकमध्ये रोजगारासाठी परप्रांतीयांची लोंढेचे लोंढे येत आहेत. सातपूरचा श्रमिकनगर परिसर आणि अंबड लिंक रोडवरील दत्तनगर, चुंचाळे शिवार या परिसरात परप्रांतीय मोठ्या प्रमाणात रहिवासाला असून, दाट लोकवस्ती या ठिकाणी उभी राहिली आहे. याच परप्रांतीयांनी अंबड लिंक रोडवरील भंगार बाजार वसविला होता.

जो महापालिकेने जमीनदोस्त केला. याच भंगार बाजाराच्या आड परप्रांतीयांकडून गुन्हेगारी कारवाया चालत. अवैधरीत्या गावठी कट्ट्याची विक्री याच परिसरातून होते. परप्रांतीय उत्तर प्रदेश, बिहारमधून गावठी कट्टे आणून नाशिकमध्ये विक्री करतात. आजही कमी- बहुत प्रमाणात अवैध धंदे सुरूच आहेत.

आलेल्या परप्रांतीयांकडे सहज आश्रय मिळत असल्याने तिकडचे सराईत गुन्हेगारही येतात आणि गुन्हेगारी कृत्य करून पसार होतात. गुन्ह्यानंतर पोलीसांना खबर मिळते, तोपर्यंत संशयित परराज्यात निसटलेले असतात. दोन दिवसांपूर्वीच संतोष जयस्वाल या परप्रांतीय युवकाचा खूनही परप्रांतीयांनीच केला. यामागे त्यांच्यातील जुने वाद असल्याचे समोर येते आहे.

याचप्रमाणे, सातपूरला श्रमिकनगर, अंबडच्या चुंचाळे शिवारातील दत्तनगर या परिसरामध्ये बहुतांशी परप्रांतीय रहिवासी असून, काही महिन्यांपूर्वी त्यांच्यातीलच दोन गटामध्ये रात्री वाद होऊन नागरिकांच्या घरांवर दगडफेकीचे प्रकार घडले होते. याशिवाय वारंवार हाणामाऱ्या, छेडछाडीचे प्रकार घडत असतात. त्यामुळे सदरचा परिसर शहरातील सर्वाधिक संवेदनशिल बनला आहे.

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

crime news
Nashik News: चोरीला गेलेला रस्ता पंधराव्या वित्त आयोगातील शिवरस्ता? रस्त्यावरून तक्रारदार अन ZPमध्ये जुंपली!

‘मुथूट’ दरोड्याचा कटही येथेच शिजला

उंटवाडी रोडवरील मुथूट फायनान्स कार्यालयावर गेल्या २०१९ मधील दरोड्याच्या घटनेमध्ये अभियंता संजू सॅम्युअल याची संशयितांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या गुन्ह्यातील सारे संशयित हे परप्रांतीय होते.

तसेच, संशयित हे दोन ते तीन आठवडे सातपूरच्या श्रमिकनगर परिसरात रहिवासाला होते. परंतु पोलिस ठाणे आणि गोपनीय शाखेलाही पाच महिन्यांपासून शिजत असलेल्या दरोड्याच्या कटाची माहिती मिळू शकली नव्हती.

पोलिसांचे नेटवर्क कुचकामी

अंबड- सातपूर पोलिस ठाण्यासह गोपनीय शाखेचे नेटवर्कच कुचकामी ठरल्याचे यापूर्वीही अनेकदा प्रकर्षाने समोर आलेले आहे. पूर्वीसारखे पोलिसांकडे खबऱ्यांचे नेटवर्क राहिलेले नाही. बहुतांश वेळा पोलिसांना गुन्ह्याची माहिती सोशल मीडियावरूनच मिळत असते.

गस्ती पथके नावाला गस्त घालतात. गल्ली- बोळातील खबरी पोलिसांना मिळेनासा झाल्या आहेत. परिणामी परप्रांतीय गुन्हेगार नाशिकमध्ये येऊन राहतात. याची साधी कुणकूणही पोलिसांना नसते.

crime news
Subhash Desai | दाओसमधील करार ही निव्वळ धूळफेक : सुभाष देसाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.