Satyajeet Tambe News : शैक्षणिक धोरणाची जलद, प्रभावी अंमलबजावणी आवश्‍यक : आमदार सत्‍यजित तांबे

Satyajeet Tambe
Satyajeet Tambeesakal
Updated on

Satyajeet Tambe News : यापूर्वी १९८६ मध्ये शैक्षणिक धोरण अवगत झाले. त्‍यानंतर तब्‍बल ३४ वर्षांनी २०२० मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अवगत केले गेले. विविध कारणांनी या शैक्षणिक धोरणाची पूर्णपणे अंमलबजावणी होण्यासाठी २०२६ उजाडण्याची शक्‍यता आहे.

जागतिक स्‍तरावर सर्वच बाबी अत्‍यंत गतिमान पद्धतीने बदलत आहेत. आपण कालबाह्य ठरू नये, यासाठी शैक्षणिक धोरणाची जलद व प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्‍यक आहे, असे मत पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्‍यजित तांबे यांनी व्‍यक्‍त केले.

‘सकाळ’च्‍या सातपूर कार्यालयात ‘सकाळ-संवाद’ कार्यक्रमास उपस्‍थित राहताना त्‍यांनी विविध मुद्यांवर दिलखुलासपणे आपली भूमिका मांडली. सकाळ’च्‍या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर यांनी आमदार श्री. तांबे यांचे स्‍वागत केले. माजी नगरसेवक राहुल दिवे, प्रा. ज्ञानेश्‍वर गायकवाड उपस्‍थित होते. (Satyajeet Tambe statement on new education policy nashik news)

आमदार तांबे म्‍हणाले, की जागतिक स्‍तरावरील बदलांच्‍या गतीचा अंदाज घेत, तितक्‍या जलद गतीने शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. शिक्षणाचा हक्‍क कायदा (आरटीई) यामुळे देशातील प्रत्‍येक विद्यार्थ्याला शिक्षणाचा हक्‍क उपलब्‍ध झालेला असून, ही महत्त्वपूर्ण बाब आहे; परंतु लोकसहभागाशिवाय शिक्षण क्षेत्र यशस्‍वी होऊ शकत नाही.

प्रत्‍येक विद्यालयात शालेय व्‍यवस्‍थापन समिती स्‍थापन आहे का, समितीच्‍या नियमित बैठका होतात का, गुणवत्ता तपासली जाते का, असे प्रश्‍न महत्त्वाचे आहेत. त्‍यामुळे शिक्षणाचा दर्जा वाढावा, असे वाटत असेल तर सर्व काही शासनावर सोपवून चालणार नाही.

लोकांनी जागृत होणे गरजेचे आहे. आज जगातील अव्वल १०० विद्यापीठ, इन्‍स्‍टिट्यूटमध्ये भारताची एकही संस्‍था नाही. ही परिस्‍थिती पाहता शिक्षणाची गुणवत्ता सुधरविण्यावर भर देणे आवश्‍यक आहे.

युवकांच्‍या कल्‍याणासाठी जिल्हास्‍तरावर सेंटर्स

यूथ इन्‍फॉर्मेशन ॲण्ड इनोव्‍हेशन सेंटरची स्‍थापना विभागातील प्रत्‍येक जिल्हास्‍तरावर केली जात आहे. धुळे, जळगाव व नंदुरबारला जागानिश्‍चिती झाली. नाशिक जिल्ह्याकरिता शहरात महापालिकेकडे जागेसाठी पाठपुरावा सुरू आहे. जानेवारीपर्यंत हे केंद्र कार्यान्‍वित होईल. युवक कल्‍याणाच्‍या अनुषंगाने ही केंद्रे काम करतील.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Satyajeet Tambe
Sanjay Raut on Sharad Pawar: अजित पवारांविरोधात शरद पवारांचा 'गनिमी कावा'; संजय राऊतांचा मोठा दावा

शिक्षण, युवा सक्षमीकरण (एम्‍पॉवरमेंट), उद्योजकता (एंटरप्रेनरशिप) आणि जगण्यासाठी साधने (इसेन्‍शियल फॉर लाईव्‍हलीहूड) अशा चार प्रमुख बाबींवर केंद्रामार्फत काम केले जाईल. अभ्यासिका, को-वर्किंग स्‍पेस, संशोधनास चालना असे विविध उपक्रम यूथ क्‍लबच्‍या माध्यमातून राबविले जातील.

गुगलच्‍या भेट, मस्‍कच्‍या धोरणापासून सॅम पित्रोदांच्‍या भेटीची सांगितली आठवण

नाशिकच्‍या काही अभियंत्‍यांबरोबर गुगल कार्यालयास दिलेल्‍या भेटीबाबत तांबे म्‍हणाले, की ‘तुमचे डोके घेऊन या, डोकेदुखी आमच्‍याकडे द्या’ अशी साधी सोपी भूमिका घेत कार्यालयीन रचना केलेली आहे. तिथे प्रत्‍येक इमारतीत सर्व पायाभूत सुविधांची उपलब्‍धता आहे. मुंबईसारख्या शहरात चाकरमान्‍यांचा बहुतांश वेळ प्रवासातच वाया जात असल्‍याने उत्‍पादकतेवर परिणाम झालेला आहे.

त्‍यामुळे गुगलसारख्या कंपन्‍यांचे धोरण, कार्यालयाचा आदर्श घेतला पाहिजे. इलॉन मस्‍कच्‍या ‘एक्‍स’चे विस्‍तारित स्‍वरूप विशद करताना तांबे म्‍हणाले, की भविष्यात जगण्यासाठी सर्वकाही एका ॲपवर उपलब्‍ध करण्याच्‍या दिशेने मस्‍क काम करीत आहेत. आठ-दहा वर्षांत काही कामच उरणार नाही. तेव्‍हा या ॲपद्वारे सर्व सेवा प्राप्त करण्याची सुविधा उपलब्‍धतेवर काम सुरू असल्‍याच्‍या बाबीकडे त्‍यांनी लक्ष वेधले.

सॅम पित्रोदांसोबत भेटीविषयी तांबे म्‍हणाले, की आजवर अनेकदा पित्रोदा यांच्‍याबरोबर भेट झालेली आहे. माहिती तंत्रज्ञानाची क्रांती घडविणाऱ्या पित्रोदा यांच्‍याकडून भविष्याचा वेध घेतला. आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स (एआय) व असे आधुनिक तंत्रज्ञान भविष्यात प्रभावी ठरेल, असा आशावाद त्‍यांनी या भेटीत व्‍यक्‍त केल्‍याचे तांबे म्‍हणाले.

Satyajeet Tambe
Satyajeet Tambe : 'मलाही मुलगी आहे, म्हणूनच.... मुलांना उद्देशून काय म्हणाले आमदार सत्यजीत तांबे?

मूठभर लोकांमुळे शिक्षण क्षेत्र बदनाम होऊ द्यायला नको

शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्‍या मुद्यावर तांबे म्‍हणाले, की लाचखोर अधिकारी जितका दोषी आहे, तितकेच दोषी त्‍यांना लाच देणारेही आहेत. मूठभर लोकांमुळे सध्या शिक्षण क्षेत्र बदनाम होते आहे. या भ्रष्टाचाराला आळा घालायचा असेल, तर कुठल्‍याही कामासाठी लाच नाकारण्याचे धाडस शिक्षक, शिक्षण क्षेत्रातील घटकांनी दाखविले पाहिजे.

प्रत्‍येकात हवी ‘राजकीय साक्षरता’

आपण किती स्‍वच्‍छ हवेत श्‍वास घेतो, हेही राजकारण ठरविते. एकेकाळी इंदूरसारखे शहर प्रचंड अस्‍वच्‍छ होते; परंतु तेथील राजकीय नेतृत्‍वाने योग्‍य अधिकाऱ्यांना संधी देऊन त्‍यांच्‍या माध्यमातून सकारात्‍मक बदल घडविले.

आज इंदूरच्‍या हवेची गुणवत्ता प्रचंड सुधारलेली आहे. नागरिकांच्‍या जगण्यावर राजकारणाचा प्रभाव असल्‍याने प्रत्‍येक नागरिकात राजकीय साक्षरता असणे आवश्‍यक असल्‍याचे मत तांबे यांनी व्‍यक्‍त केले.

इतक्‍या दिवसांत पक्षश्रेष्ठींनी बोलवायला हवे होते...

आमदारकीची अपक्ष लढविलेली निवडणूक अन्‌ त्‍यानंतरच्‍या घडमोडीबाबत विचारलेल्‍या प्रश्‍नावर तांबे म्‍हणाले, की मुळातच आम्‍ही काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत. इतक्‍या दिवसांत पक्षश्रेष्ठींनी बोलावून विचारपूस करायला हवी होती, अशी भावना त्‍यांनी व्‍यक्‍त केली. राज्‍यातील सध्याच्‍या राजकीय घडामोडींविषयी ते म्‍हणाले, की ‘राष्ट्रवादी’चा विषय हा त्‍यांच्‍या पक्षांतर्गत विषय आहे. मी अपक्ष असल्‍याने कुठल्‍याही पक्ष, नेत्‍यावर बोलण्याचा अधिकार नाही.

Satyajeet Tambe
Satyajeet Tambe: छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांची उपेक्षाच : आमदार तांबे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.