Ranji Trophy : रणजी स्पर्धेत सत्यजितचे 7 सामन्‍यात 20 बळी!

Satyajit Bacchav
Satyajit Bacchavesakal
Updated on

नाशिक : येथील डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छावने महाराष्ट्र संघातर्फे २०२२-२३ च्या रणजी चषक हंगामात लक्षणीय कामगिरी केली आहे. स्पर्धेतील साखळी स्पर्धेत सात सामन्यात २० बळी घेतले. इतर तीन गोलंदाजांसह सर्वाधिक बळी घेत शीर्षस्थान मिळवण्याची कामगिरी केली. (Satyajit bacchav 20 wickets in 7 matches in Ranji trophy tournament nashik news)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आयोजित रणजी चषकाच्‍या हंगामातील साखळी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे सामने १३ डिसेंबर ते २७ जानेवारी या कालावधीत विविध ठिकाणी पार पडले. एलिट ब गटात महाराष्ट्राबरोबर दिल्ली, सौराष्ट्र, आंध्र, आसाम, तमिळनाडू, हैद्राबाद व मुंबई संघांचा समावेश होता.

सत्यजितने सात सामन्यातील ११ डावांत २५१.२ षटकांत ३९ निर्धाव षटके टाकत २० बळी घेतले. यात षटकामागे केवळ ३.११ धावांची सरासरी राखली. या दरम्यान १९ धावांत ३ बळी अशी एका डावातील सर्वोत्तम कामगिरी करताना आंध्रप्रदेशवर १३१ धावांनी विजय मिळविण्यात हातभार लावला.

आसाम विरुद्ध १८९ धावांत ५ बळी अशी पूर्ण सामन्यातील रणजी चषक हंगामातील वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. याप्रकारे एलिट ब गटात सौराष्ट्र व आंध्र पाठोपाठ, बलाढ्य मुंबई संघाच्या वरचे तिसरे स्थान मिळवण्यात सत्यजितने महाराष्ट्र संघातर्फे आपला वाटा उचलला.

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

Satyajit Bacchav
Nashik News : छत्रपती सेनेकडकडून 21 फुटी कवड्यांची माळ; विश्वविक्रमासाठी नोंदणी

सात सामन्यात महाराष्ट्र संघाने तीन विजय मिळवले. चार सामने अनिर्णित राहिले. शेवटच्या साखळी सामन्यात मुंबईविरुद्धच्या रोमांचक सामन्यात दोन्ही डावात प्रत्येकी २ बळी सत्‍यजितने मिळवले. पहिल्या डावातील दोन बळींमुळे महाराष्ट्र व मुंबई या दोन्ही संघांचा पहिला डाव ३८४ धावावर संपला.

त्यामुळे कोणालाच पहिल्या डावातील आघाडीचे गुण मिळवता आले नाहीत.महाराष्ट्र संघाची बाद फेरीतील प्रवेश करण्याची संधी थोडक्यात हुकली. दुसऱ्या डावात मुंबई संघाने निर्णायक विजयासाठी अतिशय निकराचे प्रयत्न केले.

या सामन्यातील चौथ्या व अखेरच्या डावात सत्यजितने महाराष्ट्र संघातर्फे गोलंदाजीची सुरवात करत एका बाजूने उरलेल्या निर्धारित वेळेत २७.३ मधील १३.३ षटके टाकत २ बळी मिळवून मुंबईला निर्णायक विजयापासून रोखले.

Satyajit Bacchav
Nashik News : जिल्ह्याचा टंचाई आराखडा यंदा 2 कोटींनी घटला!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.