Nashik leopard News: वनविभागाच्या अथक प्रयत्नामुळे सावता नगरचा बिबट्या जेरबंद; नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

Savata Nagars leopard jailed due to forest department tireless efforts
Savata Nagars leopard jailed due to forest department tireless effortsesakal
Updated on

सिडको : सिडको परिसरातील सावतानगर येथे पहाटे बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. या बिबट्याचे वनविभागाने रेस्क्यु ऑपरेशन करुन अखेर त्यास जेरबंद केले आहे.

सिडको परिसरात मळे व लगतच्या परिसरात असलेल्या नागरी वस्तीमध्ये बिबट्याचे दर्शन होत आहे. परंतु आता सिडको सारख्या दाट वसाहतीमध्ये देखील बिबट्याचे दर्शन घडून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Savata Nagars leopard jailed due to forest department tireless efforts Citizens breathed sigh of relief Nashik News)

शुक्रवारी बिबट्या सिडको सारख्या दाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणी देखील आढळून आला आहे. शिवसेना (उबाठा गट) महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या सावतानगर येथील संपर्क कार्यालयाजवळील सूर्योदय कॉलनी मध्ये बिबट्या आढळून आला.

या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये बिबट्या कैद झाला. सकाळच्या वेळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले. त्यानंतर तातडीने याची माहिती सुधाकर गुजर यांना नागरिकांनी फोनवरून माहिती दिली.

त्यांनी तातडीने ही माहिती वनविभाग आणि अंबड पोलिसांना कळविली. त्यानंतर अंबड पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच वनविभागाची रात्रीच्या वेळी असणारी रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली.

या परिसरातील नागरिकांना बिबट्या आल्याचे कळाल्यानंतर या परिसरात असलेल्या नागरिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने परिसरातील नागरिकांनी या परिसरात गर्दी केली.

तसेच सिडको परिसरातील नागरिक या ठिकाणी जमा झाले घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी देखील या ठिकाणी बंदोबस्त वाढवला.

सावतानगर नंतर बिबट्याने सीजीएसटी विभागाच्या परिसरात धुम ठोकली. तेथून त्याचे रेस्क्यु करण्याचे काम वनविभागाचे अधिकारी करीत होते.

Savata Nagars leopard jailed due to forest department tireless efforts
Nashik Leopard News: निळवंडी शिवारातील 'तो' बिबट्या अखेर जेरबंद

सावता नगर परिसरामध्ये बिबट्या पकडल्याची महिती वनविभागाच्या अधिकारी वृषाली गाडे व अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनीं कळविले.

आसाम राज्यात काही कामानिमित्त गेलेले सुधाकर बडगुजर यांना नागरिकांनी फोन केल्यानंतरही त्यांनी कुठलेही कारण न देता वन विभाग व पोलीस ठाण्यात फोन करून सदर घटनेची माहिती दिली.

त्वरित या संदर्भात पावले उचलावी व नागरिकांना भिती मुक्त करावे. अशी विनंती केली. बडगुजर यांची तत्परता बघून नागरिकांनी देखील त्यांच्या या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.

"सकाळी सावता नगर परिसरामध्ये बिबट्या शिरल्याची माहिती भ्रमणध्वनी वरून नागरिकांनी दिली. तात्काळ मी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधून सदर घटनेची माहिती व व्हिडिओ पाठविला. त्यानंतर वन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन अवघ्या काही तासांमध्ये बिबट्याला जेर बंद केले. त्यामुळे आम्ही नागरिकांनी दाखवलेली सतर्कता व वन विभागाने केलेली चपळाई या दोघांचे आभारी आहोत."

- सुधाकर बडगुजर, महानगर प्रमुख, शिवसेना

"सावता नगर परिसरातील रायगड चौक येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ शुक्रवारी सकाळी सात वाजेच्या दरम्यान आम्हां नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले. तात्काळ आम्ही आसाम दौऱ्यावर असलेल्या प्रभागातील शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांना भ्रमणध्वनीद्वारे कळविले. त्यांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर अवघ्या काही तासात बिबट्याने बिबट्याला वन विभागाने जेरबंद केले. त्यामुळे आम्ही वन विभाग व सुधाकर बडगुजर यांचे आभारी आहोत. ज्यांच्यामुळे आमच्या एकाही नागरिकाला कुठल्या प्रकारची ईजा झाली नाही."- रेखा राहणे, सावता नगर, सिडको

"माहिती मिळताच वन विभागाची संपूर्ण टीम घेऊन सर्व साहित्यांशी घटनास्थळी पोहोचलो. दोन तासांच्या आतापर्यंत बिबट्यास बेशुद्ध करण्यास यश आले. पंधरा मिनिटांनी त्याला जाग आली सध्या वन विभागाच्या ताब्यात असून त्याला गंगापूर रोड येथील नर्सरी मध्ये ठेवण्यात येईल. नागरिकांनी दाखवलेली सतर्कता व समजूतदारपणा यामुळे हे सर्व शक्य झाले आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही."- अनिल अहिरराव, वन परिमंडळ अधिकारी

Savata Nagars leopard jailed due to forest department tireless efforts
Leopard Attack : मोटरसायकलवरून जात असलेल्या कुटुंबावर बिबट्याचा हल्ला; हातातील बॅग बिबट्याच्या तोंडावर मारल्याने मोठा प्रसंग टळला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.