Nashik News : इगतपुरी तालुक्यातील परिवहन आगारास नवे आगारप्रमुख लाभल्यानंतर एस.टी.चा कारभार सुधारेल, अशी अपेक्षा होती.
मात्र इगतपुरी आगाराच्या गलथान कारभारात आणखीनच वाढ झाली आहे, अशी प्रवाशांची तक्रार आहे. (schedule of Igatpuri Agar collapsed Plight of commuters including school students during heavy rains Nashik News)
एस.टी.चे ग्रामीण भागातील वेळापत्रक कोलमडले असून, वाहतूक नियंत्रण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही कोणती बस कधी येईल, हे सांगणे अवघड झाले आहे. इगतपुरी आगारात नादुरुस्त बसची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
‘बस कधी येणार’, या प्रश्नाला ‘बसचे दुरुस्तीचे काम सुरू आहे’, असेच उत्तर मिळत आहे. दुसरीकडे डिझेलचाही मोठा प्रश्न असून, काही बस इंधनाअभावी उशिरा सुटतात, तर काही जागेवरच उभ्या राहात आहे.
इगतपुरी आगाराचे अधिकारी तर ‘आओ जाओ घर तुम्हारा’ या उक्तीप्रमाणे सगळा भार कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर टाकून मोकळे होत आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
आदिवासी भागातील शालेय फेरी बंद
दरम्यान, शासनाने शालेय विद्यार्थ्यांच्या सोईसाठी बस देऊनही या बस फेऱ्या शालेय वेळापत्रकानुसार आवश्यक वेळेत धावत नसल्याने शालेय विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल सुरू आहे. मात्र तक्रारी केल्यानंतर उपाय करण्याऐवजी थातूरमातूर उत्तरे दिली जात आहेत.
शासनाने बस प्रवाशांना विविध सवलती देऊ केल्या आहेत. मात्र ढिसाळ व्यवस्थापनामुळे या सेवाचांही बोजवारा उडाला असून, ‘सवलती नको, वेळेवर बससेवा द्या’, अशी मागणी प्रवासी करत आहेत.
बस अनागोंदी कारभाराचा कळस
शासनाने विविध सवलती बस प्रवाशांना दिल्या आहेत. मात्र नादुरुस्त बस, इंधनाची तीव्र समस्या यामुळे इगतपुरी आगाराचे वेळापत्रक पूर्णतः कोलमडले आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत असून, यात सर्वाधिक विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिक यांचे हाल होत आहेत.
"सवलत नसणारे व पूर्ण भाडे भरणारे प्रवाशांनी बसकडे पाठ फिरविली असून, प्रसंगी सवलत असणारेही बसचा काही भरवसा नाही, अशा प्रतिक्रिया देत अन्य प्रवासी सेवांकडे वळत आहेत. आगारप्रमुखांसह अधिकाऱ्यांचे बस व्यवस्थापनाकडे पूर्णतः दुर्लक्षच असून, सर्व कारभार कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर सोपविला जातो आहे." - नवनाथ गायकर, सामाजिक कार्यकर्ते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.