परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्जाची ३० पर्यंत मुदतवाढ

scholarship
scholarship Google
Updated on

नाशिक : अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर पदवी, संशोधनात्मक अभ्यासक्रमाच्या (पीएच.डी.) अध्ययनासाठी आर्थिक मदत केली जाते. या योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२१- २२ साठी परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविले होते. अर्जाची मुदत वाढविली असून, आता ३० जूनपर्यंत अर्ज सादर करता येतील.


सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार अर्जाच्‍या मुदतीत वाढ केली आहे. योजनेत विद्यार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन समाजकल्याण आयुक्त (पुणे) डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे. सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात अध्ययनासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. जागतिक स्तरावर तीनशेच्या आतील रँकमधील परदेशातील शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेणाऱ्या ७५ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर केली जाईल. योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांना विमानप्रवास भाडे, परदेशातील शैक्षणिक संस्थेचे शिक्षण शुल्क, निर्वाह भत्ता, आकस्मिक खर्च याचा लाभ मिळेल. अर्जाचा नमुना व सविस्तर माहितीसाठी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर रोजगार या लिंकवर भेट देण्याचे आवाहन केले आहे.

(scholarship application for students studying abroad is extended till June 30)

scholarship
अखेर पंचवटी एक्स्प्रेस होणार सुरू! नाशिक-मुंबई प्रवास सोयीचा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.