Scholarship Exam : राज्यातील 9 लाख विद्यार्थ्यांची रविवारी शिष्यवृत्ती परीक्षा

बोर्डाप्रमाणे 4 प्रश्नपत्रिका संच
scholarship
scholarshipsakal
Updated on

नाशिक/ इगतपुरी : राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृती आठवी परीक्षेसाठी राज्यातील नऊ लाख २१८ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत.

त्यांच्यासाठी सहा हजार १८३ परीक्षा केंद्रांवर आसन व्यवस्था करण्यात आली आहे. रविवारी (ता. १२) सकाळी अकरा ते दुपारी साडेतीन या वेळेत दोन सत्रांमध्ये होणाऱ्या या परीक्षेसाठी बोर्डाच्या परीक्षेप्रमाणे चार प्रश्नपत्रिका संच असणार आहेत. (Scholarship exam of 9 lakh students of state on Sunday nashik news)

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातर्फे जिल्हा पातळीवर या परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. सकाळी अकरा ते साडेबारा या वेळेत पहिला पेपर होणार आहे. तर दुसऱ्या सत्रात दुपारी दोन ते साडेतीन या वेळेत होईल.

मराठी, ऊर्दू व इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी ए, बी, सी आणि डी अशा स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका असतील. तर हिंदी, गुजराथी, तेलगू व कन्नड या माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी केवळ एकाच स्वरूपाचा प्रश्नसंच राहणार आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नाशिक जिल्ह्यातून ४९ हजार १२८ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. त्यांच्यासाठी ३५१ परीक्षा केंद्रांवर आसनव्यवस्था करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील केंद्र संचालकांसह महापालिका क्षेत्रातील केंद्र संचालकांना गुरुवारी (ता. ९) प्रशिक्षण देण्यात आले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

scholarship
CM Fellowship : मुख्यमंत्री फेलोशिप उपक्रम पुन्हा सुरू; तरुणांना या तारखेपर्यंत अर्ज करता येणार

"परीक्षा केंद्रावर वापरात येणारे गोपनीय साहित्य कसे हाताळावे, याविषयी केंद्रसंचालकांना माहिती दिली आहे. गोपनीय साहित्य शिक्षण विभागास प्राप्त होताच केंद्र संचालकांना देण्यात येईल." -भगवान फुलारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, नाशिक

वर्गनिहाय विद्यार्थी व परीक्षा केंद्र

पाचवी : ५, ३२, ६३८ विद्यार्थी, ३६४५ परीक्षा केंद्रे

आठवी : ३, ६७, ५८० विद्यार्थी, २५३८ परीक्षा केंद्रे

नाशिक जिल्ह्यातून प्रविष्ट होणारे विद्यार्थी

पाचवी : २७,३७४ विद्यार्थी, १८९ परीक्षा केंद्रे

आठवी : २१,७५४ विद्यार्थी, १६२ परीक्षा केंद्रे

scholarship
Rickshaw Beauty Competition : सौंदर्य स्पर्धेत प्रभाळे यांची रिक्षा प्रथम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.