Nashik News: शिष्यवृत्तीधारकांची दिवाळी गोड! शासनाकडून 40 कोटींचा निधी मंजूर

scholarship
scholarshipsakal
Updated on

Nashik News: शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची यंदाची दिवाळी शिक्षण विभागाने गोड केली आहे. शालेय शिक्षण विभागाने पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्तीत वाढ केली आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेतील ३२ हजार ६६७ शिष्यवृत्तीधारकांना नवीन दराने शिष्यवृत्ती दिली जाणार असून, त्यासाठी १९ कोटी रुपयांचे वितरण दिवाळीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले. (school education department has increased scholarship for class 5 and 8 nashik news)

राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या स्पर्धा परीक्षेत गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना मंजूर संचाच्या अधीन राहून या योजनेचा लाभ दिला जातो. शासन निर्णयानुसार गतवर्षीपर्यंत पाचवीसाठी कमाल एक हजार आणि आठवीसाठी कमाल दीड हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जात होती.

मात्र, या शिष्यवृत्तीच्या रकमेत आता वाढ झाली आहे. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना २०२३-२४ पासून वाढीव दराने शिष्यवृत्तीचे वितरण होणार आहे. यामध्ये पाचवीसाठी दरमहा ५०० प्रमाणे दहा महिन्यांसाठी पाच हजार व आठवीसाठी दरमहा ७५० याप्रमाणे दहा महिन्यांसाठी सात हजार ५०० रुपयांप्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

यासाठी २०२३-२४ मध्ये ४० कोटी मंजूर झाले आहेत. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरणासाठी ४९ कोटी ९४ लाख ५० हजार रुपये आवश्यक आहे. त्यापैकी १९ कोटी ३९ लाख १९ हजारांचा निधी प्राप्त झाला आहे. हा निधी नवीन दराने पहिल्यांदाच शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे.

scholarship
Lakshmi Pujan 2023: दीपोत्सवात CNG, इलेक्ट्रिक चारचाकीसह दुचाकींची विक्री! वाहनांच्या दालनांना यात्रेचे स्वरूप

पाचवीसाठी एकूण संचसंख्या १६ हजार ६८३ एवढी, तर आठवीसाठी १६ हजार २५८ संचसंख्या आहे. दर वर्षी पाचवीच्या परीक्षेतून शिष्यवृत्तीधारक ठरलेल्या आणि पुढे सहावी, सातवी, आठवीमध्ये घेणाऱ्या एकूण ५० हजार ४९ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. आठवीच्या परीक्षेतून शिष्यवृत्तीधारक ठरलेल्या आणि नववी व दहावीत शिक्षण घेणाऱ्या ३२ हजार ५१६ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.

१८ फेब्रुवारीला होणार परीक्षा

२०२३-२४ करिता १८ फेब्रुवारीला राज्यात शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे. त्यासाठी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून, ९ नोव्हेंबरपर्यंत राज्यातील ३४ हजार ४३२ शाळांमधील पाचवीच्या तीन लाख ७७ हजार ८०६ आणि आठवीच्या दोन लाख ८२ हजार ४५७ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज भरण्याची अखेरची तारीख ३० नोव्हेंबर, तर विलंब शुल्कासह १५ डिसेंबर आहे.

scholarship
Police Diwali Festival: पोलीस कुटुंबीयांची दिवाळी घरधन्याविनाच! On Duty मुळे लक्ष्मीपूजनाला 'ते' नेहमीप्रमाणे गैरहजर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.