बंद केली म्हणून मुले भरवणार गटशिक्षणाधिकारींच्या कार्यालयात शाळा

ZP School at darewadi
ZP School at darewadiesakal
Updated on

इगतपुरी शहर (जि. नाशिक) : तालुक्यातील भाम धरणामुळे विस्थापित झालेल्या काळूस्ते येथील दरेवाडी जिल्हा परिषद शाळा बंद केल्याने येथील विद्यार्थानां इतरत्र शाळेत हलविण्याचा निर्णय झाला आहे.

इगतपुरी गट शिक्षण विभागाने बुधवारी शाळा बंद करण्याचे पत्र दिल्याने गुरुवार पासुन शाळेची घंटाच वाजली नाही.या शाळेतील इयत्ता १ ली ते ४ थी चे विद्यार्थी शाळेत आले असता शाळा का उघडली नाही म्हणून विचलीत झाले.

या चिमुरडया आदिवासी विद्यार्थाची शाळा नसल्याने व नुकसान होवु नये म्हणुन श्रमजीवी संघटनेच्या वतीने शुक्रवार ( ता.५ रोजी ) इगतपुरी येथे गटशिक्षण अधिकारी कार्यालयात शाळा भरवुन एक अनोखे आंदोलन करणार आहे. (school is closed children will be admitted to office of group education officer at igatpuri Nashik Latest Marathi News)

जागतीक आदिवासी दिनजवळ आला असतांनाच आदिवासी विद्यार्थावर हा शौक्षणीक अन्याय होत असल्याचे बोलले जात आहे.गुरुवार ( ता.५ रोजी ) लहान चिमुरडे दप्तराचे ओझे घेवुन काही मैलो प्रवास करून येणार आहेत.

दरेवाडीचे नवीन जागेत पुनर्वसन केले मात्र काही कुटुंब त्या जागेत जाण्यासाठी तयार नाही म्हणून ४० कुटुंबाचे नवीन जागेत पुनर्वसन केले आणि त्या ठिकाणी शाळा सुरू होती.मात्र ती शाळा बंद करण्याचे पत्रच शाळेच्या मुख्याध्यापकाला आले आणि शाळा बंद केली.मग या मुलांनी आता कोणत्या शाळेत शिक्षण घ्यायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ZP School at darewadi
देवगाव आश्रमशाळेतील ‘त्या’ शिक्षकाची बदली

जोपर्यंत या ठिकाणी शाळा सुरू होत नाही तोपर्यंत या सर्व मुलाना त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून उद्या ५ ऑगष्ट रोजी इगतपुरी पंचायत समिती येथे गटशिक्षणाधिकारी यांच्या कार्यलयात शाळा भरून आंदोलन करणार आहोत.

दरेवाडी गाव कमिटी प्रमुख गणपत गावंडा, उपप्रमख विमल गावंडा, सचिव रमेश गावंडा, सिताराम गावंडा, बाळु गांगड, साईनाथ गावंडा, ग्रा.प.सदस्य एकनाथ गावंडा हे आंदोलन करणार आहे.अशी माहीती श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस भगवान मधे यांनी दिली.

ZP School at darewadi
World Breastfeeding Week 2022 : बाळाची इच्छा असेपर्यंत द्यावे स्‍तनपान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.