सिन्नर (जि. नाशिक) : दीर्घप्रतीक्षेनंतर शाळांना (Schools) लवकरच सुरवात होणार असून त्यासाठी घरोघरी तयारी सुरू झाली आहे. पालक वर्गात मुलांच्या शिक्षणासाठी लागणारे साहित्याची (Material) यादी, कोणती वस्तू कुठे चांगील मिळते याचा शोध घेतला जात आहे. दोन वर्ष होऊन अनेक मुले शाळेत गेलेले नसल्याने ही खरेदी झालेली नसल्याने यंदा बहुतेकांना सर्वच नवे मिळणार आहे, किंबहुना ते घ्यावे लागणार अहे. दुसरीकडे दप्तर, पुस्तके, वह्या ते गणवेश (Uniform) या सर्वच वस्तूंच्या किंमतीत २० ते तीस टक्क्यांनी वाढ झाल्याने पालकांच्या खिशाला यंदा मोठी झळ बसणार आहे. (school material Prices raised by 20 to 30 percent Nashik News)
एकिकडे घरगुती किराणा मालापासून तर घरातील वाहनांच्या इंधनापर्यंत अनेक गोष्टींचे दर वाढलेले असल्याने सर्वसामान्य महागाईने त्रस्त झालेले आहेत, त्यातच घरातील स्वयंपाकाचा गॅसही महागला आहे. अशातच शैक्षणिक साहित्याची सुद्धा थोड्या प्रमाणात दरवाढ झाल्याने नागरिकांना अजून महागाईचे चटके सोसावे लागणार आहेत. कागद, शाई, स्टीलचे दर वाढल्याने कंपास आणि कंपास साहित्य देखील २० टक्क्यांनी महागले असून हे विद्यार्थ्यांच्या पाठिवरील स्कूल बॅगचे दर देखील १० ते १५ टक्क्यांनी वाढले आहेत.
यंदा पहिल्या दिवसापासून शाळा ऑफलाईन सुरू होणार असल्याने शालेय साहित्य खरेदीची लगबग पालकांकडून सुरू आहे. मात्र, स्टेशनरीचे वाढलेले दर अनेकांना धक्का देणारे ठरत आहेत. कोरोनानंतरच्या काळात कागदाचा तुटवडा, वाढलेले दर, प्रिंटींगसाठीच्या शाई (इंक)च्या वाढलेल्या किंमती, वाहतुकीसाठीच्या इंधनाचे बेफाम वाढलेले दर व त्यामुळे महागलेली मालवाहतूक असा एकत्रित परिणाम नोटबुक, गाइडस् यांसारख्या प्रिंटींग साहित्याचे दर २० ते ३० टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.
विविध कंपन्यांच्या नोट बुक, लाँग बुकसह इतर बुक प्रत्येक नगामागे ५ ते १० रुपयांची महाग झाले आहे. चित्रकला साहित्यही महागले आहे, अनेक कंपन्या थेट शाळेशी संपर्क साधत ऑफर देत ऑर्डर घेत असल्याने स्टेशनरी व्यावसायिक ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अनेक शैक्षणिक साहित्यांची दुकाने सुरू झालेली आहेत. ग्रामीण भागातील कामांमध्ये व्यस्त असल्याने अजून बाजारपेठ शांतता आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.