Nashik Accident News: कंसारा चौकात स्कार्पिओ अन दुचाकी अपघातात दुचाकी जळून खाक; दोघे जखमी

Accident
Accidentesakal
Updated on

Nashik Accident News: मखमलाबाद - म्हसरूळ लिंकरोड वरील कंसारा माता चौकात रात्रीच्या सुमारास स्कार्पिओ व दुचाकी अपघातात मोटर सायकल अपघातात दुचाकी अक्षशः जळून खाक झाली आहे.

अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले असून अपघातास जबाबदार स्कार्पिओ चालकास म्हसरूळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Scorpio and two wheeler accident at Kansara Chowk Bike burnt Both injured Nashik Accident News)

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मखमलाबाद - म्हसरूळ लिंकरोड वरील कंसारा माता चौकात बुधवार ( ता.१३ ) रोजी रात्रीच्या सुमारास स्कार्पिओ क्रमांक एमएच १५ सीएम ५८५४ या चारचाकीने दुचाकी क्रमांक जीजे ३० ई ५४७८ या दुचाकीस जोरदार धडक दिल्याने दुचाकी जळून खाक झाली.

तर अपघातात दुचाकी चालक व त्याचा जोडीदार गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत पोलीस कर्मचारी सोनीराम लहानू जाधव यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

स्कार्पिओ चालक गणेश विजय लहरे वय-३३ रा. राज विलास सोसायटी फ्लॅट नंबर २ बोरगड म्हसरूळ , नाशिक याच्यावर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Accident
Bharatpur Accident: भरतपूरमध्ये ट्रक-बसचा भीषण अपघात! मथुरेला दर्शनासाठी जाणाऱ्या 11 भाविकांचा मृत्यू

याबाबत म्हसरूळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजू पाचोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी जगताप पुढील तपास करत आहे .

"पांढरे पट्टे मारण्याची गरज !"

मखमलाबाद - म्हसरूळ रोडवरील कंसारा चौक अतिशय धोकेदायक चौक बनला आहे. याठिकाणी अपघात नित्याचेच झाले आहेत. रात्रीच्या वेळी हा चौक वाहन चालकांच्या लक्षात येत नाही. वाहनांचा वेग रात्रीच्या वेळी जास्त असल्याने अपघात घडतं असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. या ठिकाणच्या चौकात नाशिक महानगरपालिकेने पांढर पट्टे मारण्याची गरज आहे. त्यासाठी नाशिक महानगर पालिकेकडे पत्रव्यवहार करणार आहोत."

- राजू पाचोरकर, पोलिस निरीक्षक, म्हसरूळ पोलिस ठाणे, म्हसरूळ

Accident
Nashik Crime: पत्नीच्या प्रियकरानेच काढला ‘त्याचा’ काटा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.