Jindal Fire Accident : SDRF पथक तळ ठोकून; NDRFच्‍या जवानांची मदत

Jindal Fire Accidnt
Jindal Fire Accidntesakal
Updated on

नाशिक : मुंढेगाव शिवारातील जिंदाल पॉलिफिल्‍म कंपनीला लागलेली आग विझविण्यासाठी नॅशनल डिजास्‍टर रिस्‍पॉन्‍स फोर्स (एनडीआरएफ), स्‍टेट डिजास्‍टर रिस्‍पॉन्‍स फोर्स (एसडीआरएफ) च्या जवानांचीही मदत घेण्यात आली आहे. एस.टी.आर.एफ. चे पथक तळ ठोकून आहे. पथक परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेऊन आहे. (SDRF team camped NDRF personnel help Jindal Fire Accident case nashik news)

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

जिंदाल कंपनीला आग लागल्‍यानंतर विविध ठिकाणांहून अग्‍निशमन विभागाचे बंब घटनास्‍थळी दाखल झाले होते. अडकलेल्‍या कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यासह आगीवर नियंत्रणासाठी लष्कराची मदतीचा निर्णय घेण्यात आला होता. प्रसंगी हेलिक्रॉफ्टरच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्‍न केले जाणार होते.

परंतु घटनास्‍थळी असलेल्या रसायनांचा साठ्यामुळे हा पर्याय वगळण्यात आला. दरम्‍यान, एन.डी.आर.एफ.च्‍या जवानांसह एस.डी.आर.एफ.च्‍या पथकाने बचाव कार्यात मदत केली. सोमवारी (ता.२) आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश येत असल्‍याने एन.डी.आर.एफ.च्‍या पथकाला घटनास्‍थळाहून माघारी फिरण्यास जिल्‍हा प्रशासनाकडे परवानगी मागितली होती.

जिल्‍हाधिकाऱ्यांनी ही परवानगी दिली असल्‍याचे समजते. असे असले तरी परिस्‍थिती पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत एस.डी.आर.एफ. चे पथक घटनास्‍थळी तळ ठोकून राहाणार आहे. या दोन्‍ही पथकांकडून बचाव कार्य करत असताना कंपनीत अडकलेल्‍या कर्मचार्यांची सुखरुप सुटका करण्यासह त्‍यांना सुरक्षित स्‍थळी नेण्यासह अन्‍य बचावात्‍मक कार्य हाती घेतले होते.

Jindal Fire Accidnt
Jindal Fire Accident : धुराच्या लोळांनी व्यापला आसमंत! कामगार मंत्र्यांकडून पाहणी अन् परिसरात हायअलर्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.