Recruitment : जिल्हा सैनिक कार्यालयाच्या अधिपत्याखालील सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण केंद्र व सैनिकी मुलांच्या वसतिगृहात तात्पुरत्या स्वरूपात विविध पदांची कंत्राटी भरती केली जाणार आहे.
इच्छुकांनी २९ एप्रिलपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कमांडर ओंकार कापले यांनी केले आहे. (Seasonal Recruitment in Pre Service Training Center nashik news)
हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’
सहाय्यक अधीक्षिका, स्वयंपाकी व मसालची यांच्या प्रत्येकी एका पदासाठी भरती केली जाणार आहे. सहाय्यक अधीक्षिका पदासाठी पदवी अथवा पदव्युत्तर अशी शैक्षणिक पात्रता व महाविद्यालयांशी समन्वय साधण्याचा अनुभव आवश्यक आहे.
स्वयंपाकी व मसालची पदांसाठी कामाचा अनुभव आवश्यक आहे. पात्र उमदेवारांनी आपले अर्ज विहित मुदतीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नाशिक येथे सादर करावेत. माहितीसाठी जिल्हा सैनिक कार्यालयाच्या (०२५३) २५७७२५५ या दूरध्वनीवर अथवा ८६०५८७८३८९ या भ्रमणध्वणीवर संपर्क साधावा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.