Nashik News : मुंढेगाव-अस्वली रस्त्यावरील मुकणे नदीवरील नव्याने बांधण्यात येणाऱ्या पुलाचे काम दुसरा पावसाळा आला तरीही अद्याप अपूर्णच आहे. पर्यायी रस्त्यासाठी शासनाने तब्बल सात लाख पन्नास हजारांचा निधी मंजूर करुनही रस्ताच झाला नसल्याने वाहतुकीसाठी नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
शासनाचा मंजूर निधी गेला कुठे? असा प्रश्न जनतेला पडला आहे. त्रस्त नागरिकांनी रखडलेल्या पुलावर बिऱ्हाड मोर्चा काढून आंदोलन केले.
पर्यायी रस्त्याबाबत संबंधित ठेकेदारास विचारले असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात अन अनेकदा पाठपुरावा केल्यानंतर तालुक्यातील आमदारांसह लोकप्रतिनिधींना ठेकेदार तसेच प्रशासकीय अधिकारी जुमानत नसल्याचा आरोप येथील संतप्त नागरिकांनी केला आहे.
टक्केवारीच्या घोळात पुलाचे काम रखडले तर नाही ना असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. (second monsoon come but bridge still incomplete Birhad movement on blocked bridge Nashik News)
छोट्याशा मोऱ्या व मुरुम टाकून थातूरमातूर बनवलेला पर्यायी रस्ता मुकणेचे शेवटचे आवर्तन सोडल्याने वाहून गेला आहे. अशातच पावसाळा तोंडावर असल्याने निदान पर्यायी रस्ता तरी करा यासाठी येथील नागरिकांनी पुलावरच बिऱ्हाड आंदोलन केले.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी शशिकांत गजभिये, योगेश गोडसे आंदोलनास्थळी आले. नागरिकांनी अधिकाऱ्यांना घेराव घालत गेल्या दोन वर्षांपासून पुलाच्या अपूर्ण बांधकामामुळे वाहनधारकांना होत असलेल्या त्रासाबद्दल विचारणा संताप व्यक्त केला.
त्यावर अधिकाऱ्यांनी पुढील आठ दिवसात काँक्रिटचा पक्का रस्ता तयार करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले.
त्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले. माजी सभापती सोमनाथ जोशी, जानोरीचे सरपंच तथा घोटी बाजार समितीचे संचालक अर्जुन भोर, बेलगाव कुऱ्हेचे माजी सरपंच संतोष गुळवे, ॲड. भाऊसाहेब भोर, रोहिदास गायकर, कोंडाजी गुळवे, राजाराम पासलकर, शिवाजी गुळवे, बाळासाहेब मुसळे, शांताराम पासलकर, राजाराम गायकर, कैलास संधान, प्रकाश पासलकर, बाळू पासलकर, धनाजी भोर, गोरख शिंदे, नामदेव शिंदे, गोरख गायकर, सोमनाथ मांडे आदींसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
"आमदार हिरामण खोसकरांनी गतवर्षी फेब्रुवारीत पुलाचे उद्घाटन केल्यानंतर अद्यापही अर्धवट काम शिल्लक आहे. कमी उंचीच्या मोऱ्या आणि मुरुम टाकून तयार केलेला पर्यायी रस्ता मुकणेच्या आवर्तनात प्रत्येक वेळी वाहून जातो. जवळपास पंधरा-वीस गावांची वाहतूक बंद होते. विशेषतः शेतकरी, विद्यार्थी, दुग्धव्यवसायिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. आताही तसेच झाले आहे. पावसाळा तोंडावर असताना पर्यायी रस्ता निधी मंजूर असतानाही होत नसल्याने सर्व शेतकऱ्यांनी बिऱ्हाड मोर्चा काढून आंदोलन केले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी आठ दिवसात रस्ता करुन देण्याचे आश्वासन दिले आहे." -संतोष गुळवे, माजी सरपंच बेलगाव कुऱ्हे.
"पुलाचे मंजुरीच्या इस्टीमेटनुसार बांधकामाचे काम जवळपास पूर्ण झाले असून भराव आणि रस्त्याचे पुन्हा नवीन टेंडर काढण्यात आले आहे. निधीही प्राप्त झाला असून वर्कऑर्डरनंतर काम सुरु होईल, तोपर्यंत आठ दिवसात योग्य त्या उंचीच्या मोऱ्या टाकून काँक्रीटीकरण करून पक्का पर्यायी रस्ता बनवून दिला जाईल." - शशिकांत गजभिये, अभियंता सा.बा.विभाग इगतपुरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.