Nashik News : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून प्राधिकरण (विद्या प्राधिकरण) वरिष्ठ आणि निवड श्रेणी प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे.
त्यानुसार प्रशिक्षणासाठी पात्र प्रशिक्षणार्थींना १२ जून पर्यंत नोंदणी करता येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी पत्रातून दिली. (second phase of senior selection category training of teachers has started nashik news)
२०२१-२२ मध्ये ऑनलाइन पद्धतीने झालेले प्रशिक्षण एकूण ९४ हजार ५४२ प्रशिक्षणार्थींनी पूर्ण केले. प्राथमिक ते कनिष्ठ महाविद्यालयापर्यंत आता वरिष्ठ आणि निवड श्रेणी ऑनलाइन प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार या प्रशिक्षणासाठी ऑनलाइन नोंदणी करिता परिषदेमार्फत संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे.
या संकेतस्थळावर प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालय या चार गटातील पात्र शिक्षक मुख्याध्यापक प्राध्यापक, प्राचार्य याचीं नोंदणी करता येईल.
३१ मार्च २०२४ रोजी सेवेची एकूण १२ वर्षे सेवा पूर्ण झालेले प्रशिक्षणार्थी वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
तर ३१ मार्च २०२४ रोजी सेवेची एकूण २४ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वी २४ वर्षे सेवा पूर्ण झालेले प्रशिक्षणार्थींची निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील व सदर फी दोन हजार रुपये ठेवण्यात आली आहे
प्रशिक्षणासाठी चार गट
प्रशिक्षणासाठी प्राथमिक गट (पहिली ते आठवीच्या वर्गांना अध्यापन करणारे), माध्यमिक गट (नववी ते दहावीच्या वर्गांना अध्यापन करणारे), उच्च माध्यमिक गट (अकरावी ते बारावीच्या वर्गांना अध्यापन करणारे), अध्यापक विद्यालय गट (प्रथम आणि द्वितीय वर्ष अध्यापन करणारे) असे चार गट करण्यात आले आहेत.
प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करताना शिक्षकाने आपला स्वतःचा शालार्थ आयडी शाळेचा युडायस क्रमांक, ई-मेल पत्ता आदी माहिती सोबत ठेवावी. स्वतःचा शालार्थ आयडी उपलब्ध नसलेल्या शिक्षकांनी संकेतस्थळावरील शालार्थ आयडी नसलेल्या शिक्षकसाठींच्या नोंदणीचा वापर करावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.