Sri Swami Samarth Sevamarg : श्री स्वामी समर्थ सेवामार्गातर्फे सीडबॉल उपक्रमाला प्रारंभ

A child planting seedballs after seed samskara by Akhil Bharatiya Shri Swami Samarth Sevamarga. Neighbor servants.
A child planting seedballs after seed samskara by Akhil Bharatiya Shri Swami Samarth Sevamarga. Neighbor servants. esakal
Updated on

Sri Swami Samarth Sevamarg : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गातर्फे बीज संस्कार केल्यानंतर लाखो सीडबॉल डोंगराळ भाग, माळरान, मोकळी मैदाने, खासगी जागा आदी ठिकाणी टाकले जात आहेत.

सव्वाकोटी महावृक्षारोपण अभियानांतर्गत सीडबॉल उपक्रमाला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला आहे. (Seed Ball initiative started by Shri Swami Samarth Seva Marg nashik news)

सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने आणि बालसंस्कार व युवाप्रबोधन विभागप्रमुख नितीनभाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सीडबॉल उपक्रमाला प्रत्यक्ष प्रारंभ झाला आहे. हा उपक्रम सुरू करण्यापूर्वी संपूर्ण राज्यभर १ व २ जुलैला सीडबॉलवर बीज संस्कार करण्यात आले. २७ नक्षत्र वृक्षांसह बीज संस्कार झाल्यावर प्रत्येक जिल्ह्यात सीडबॉल मोकळ्या जागांमध्ये टाकले जात आहेत.

सीडबॉलमधील ‘बी’ कालांतराने रुजल्यावर नैसर्गिकरीत्या रोपाची लागवड होईल आणि पर्यावरण रक्षणाच्या कार्याला हातभार लागेल, असे या उपक्रमाचे स्वरूप आहे. त्यासाठी बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाच्या मुलांनी वर्षभर घरी फळांच्या बिया जमवून मेमध्ये सीडबॉल तयार केले आणि तेच सीडबॉल आता सर्वत्र टाकले जात आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

A child planting seedballs after seed samskara by Akhil Bharatiya Shri Swami Samarth Sevamarga. Neighbor servants.
Gurumauli Annasaheb More : घरोघरी घडवा पुंडलिक अन् श्रावणबाळ! गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचे आवाहन

संपूर्ण पावसाळ्यात हा उपक्रम राबविला जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात हजारो मुलांनी लाखोंच्या संख्येत सीडबॉल तयार केले आहेत. सव्वा कोटी महावृक्षारोपण अभियानाला सीडबॉल हा पूरक उपक्रम आहे. संगमनेरमधील वडगाव पान सेवा केंद्रातील बालसेवेकऱ्यांनी सर्वप्रथम सीडबॉल टाकायला सुरवात केली. त्यापाठोपाठ उत्तर महाराष्ट्रातील इतर जिल्हे, कोकण, पालघर, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र येथेही सीडबॉल उपक्रम सुरू झाला आहे.

बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागातर्फे सीडबॉल उपक्रमाबरोबरच वृद्धाश्रममुक्त भारत, बालसंस्कार वर्गांची निर्मिती, युवक-युवती, महिला आणि बालसेवेकऱ्यांना स्वसंरक्षणाचे तंत्र शिकवले जात आहे. प्रत्येक उपक्रमात बालसंस्कार वर्गाच्या मुलांचा सहभाग कौतुकास्पद ठरत आहे.

A child planting seedballs after seed samskara by Akhil Bharatiya Shri Swami Samarth Sevamarga. Neighbor servants.
Gurumauli Annasaheb More: अध्यात्मातून राष्ट्रविकास साधा : गुरुमाऊली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.